नारायणगावात मतिमंद मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: October 1, 2016 03:33 IST2016-10-01T03:33:25+5:302016-10-01T03:33:25+5:30

येथील ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने १९ वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार केला असून, पोलिसांनी या ज्येष्ठ नागरिकास अटक केली आहे, अशी माहिती नारायणगाव

Maratham girl raped in Narayanagar | नारायणगावात मतिमंद मुलीवर बलात्कार

नारायणगावात मतिमंद मुलीवर बलात्कार

नारायणगाव : येथील ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने १९ वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार केला असून, पोलिसांनी या ज्येष्ठ नागरिकास अटक केली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली .
विलास ऊर्फ चिमाजी मोरे (रा. कुकडी कॉलनी, नारायणगाव ) याला नारायणगाव पोलिसांनी अटक केली असून, आज (दि. ३०) जुन्नर न्यायालयाने मोरे याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची येरवडा येथे रवानगी करण्यात आली आहे.
विलास मोरे याने १९ वर्षीय मुलीला पाच महिन्यांपूर्वी कुकडी कॉलनीत येथे आइस्क्रीम खायला देतो असे सांगून नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. ही गोष्ट जर कोणाला सांगितली तर तुझ्या आई वडील व तुला मारून टाकीन अशी तिला धमकी दिली होती.
यानंतर गेली पाच महिने तो तिच्यावर वारंवार बलात्कार करीत होता. सदर मुलगी गरोदर असल्याचे तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर अधिक चौैकशी केली असता त्या मुलीने हा प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Maratham girl raped in Narayanagar