शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : अॅट्रोसिटीबाबत दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही?, उदयनराजे भोसलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 11:25 IST

Maratha Reservation: गुन्हे मागे घेतले नाहीत तर मोठा भडक उडेल- उदयनराजे भोसले

पुणे - सर्वोच न्यायालयाने शिथिल केलेला अॅट्रोसिटीचा कायदा पूर्ववत करण्यासाठो केंद्र सरकारने दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात शुक्रवारी (3 ऑगस्ट) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळेस त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

मराठा आंदोलकांवर दाखल केले खटले मागे घेतले नाहीत तर मोठा भडका उडेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. उदयनराजे पुढे असे म्हणाले की, परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही. याची राज्यकर्त्यांसह विरोधक आणि राज्यातील सर्व आमदारांनी जाणीव ठेवावी. त्यासाठी वेळ काढून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. आधीच 25 ते 30 वर्ष उशीर झाला आहे. लोकसभा, राज्यसभा, न्यायालय या फेऱ्यात पुन्हा 30 वर्ष उशीर नको. अन्यथा एकदा घोषणातरी करून टका की पुढची 30 वर्ष आरक्षण देत येणार नाही. काहीतरी भरीव सांगा.

उदयनराजे असंही म्हणाले की, राज्यात 54 मूक मराठा मोर्चे निघाले. त्याची जगभरातून दखल घेतली गेली. पण त्यावेळी आश्वासन दिले आणि नंतर या प्रश्नाला बगल दिली. त्याच वेळी हा प्रश योग्य पद्धतीने हाताळला गेला असता तर आज ही परिस्थिती ओढविली नसती.आरक्षणाच्या मुद्याकडे राजकारण किंवा इतर वैयक्तिक गोष्टींशी जोडू नये. आज या समाजावर वेळच अशी आली आहे की आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सतेवरील राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनीहो माणुसकीच्या नात्याने हे समजून घेतले पाहिजे. आपल्या मनातील वेदना व्यक्त करण्यासाठी कोणताही मार्ग राहत नाही तेव्हा आंदोलनाशिवाय पर्याय राहत नाही.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा