शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाबाबत मराठा क्रांती मोर्चा वाजवणार 'अजितदादां 'च्या घरासमोर ढोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 15:26 IST

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात आली

ठळक मुद्देउपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या होणार आंदोलन

बारामती : मराठा आरक्षण प्रश्नाबाबत आक्रमक झालेला मराठा क्रांती मोर्चा थेट बारामती येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धडकणार आहे. पवार यांच्या शहरातील सहयोग सोसायटीतील निवासस्थानासमोरील शनिवारी (दि. २६) सकाळी ९ ते ११ वेळेत ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर ९ आॅगस्ट २०१८ रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. 

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही स्थगिती राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याने मिळाल्याचा आरोप केला आहे. मराठा आरक्षणाला मिळालेली ही स्थगिती राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे मिळाली आहे. ही स्थगिती उठेपर्यंत कोणतीही शासकीय भरती करू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने यापूर्वी देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांच्या निवासस्थानासमोर शहर आणि तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या हे आंदोलन केले जाईल. मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात, आरक्षणाच्या मागणीसाठी बारामतीचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचे क्रांती मोर्चाच्या वतीने कळविण्यात आले आहे. यावेळी सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्यासाठी आवाहन देखील करण्यात आले. यामध्ये सोशल डिस्टंन्सींग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे. समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था पाळण्याबरोबरच स्वत:ची व सामाजिक स्वास्थ्याची जबाबदारी घेत आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कळविण्यात आले आहे. दरम्यान बारामतीमध्ये महायुतीच्या सत्ता काळात यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माळेगाव येथील गोविंदबाग निवासस्थानासमोर ९ आॅगस्ट २०१८ रोजी आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये अजित पवार यांनी देखील त्यावेळी सहभाग घेतला होता. आता अजित पवार हे सत्ताधारी असून राज्यातील क्रमांक दोनच्या पदाची सुत्रे त्यांच्या हाती आहेत. आता त्यांच्या निवासस्थानासमोरच आंदोलन होणार आहे. ————————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकार