पिरंगुट परिसरातील अनेक कंपन्यात फायर सिस्टीम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:35+5:302021-06-09T04:14:35+5:30

पुणे : पिरंगुट परिसरात जवळपास ७०० ते ८०० कंपन्या आहेत. छोटे आणि मोठे असे दोन्हीही उद्योग या ठिकाणी आहेत. ...

Many companies in the Pirangut area do not have a fire system | पिरंगुट परिसरातील अनेक कंपन्यात फायर सिस्टीम नाही

पिरंगुट परिसरातील अनेक कंपन्यात फायर सिस्टीम नाही

पुणे : पिरंगुट परिसरात जवळपास ७०० ते ८०० कंपन्या आहेत. छोटे आणि मोठे असे दोन्हीही उद्योग या ठिकाणी आहेत. यात रासायनिक, ऑटोमोबाइल, फूड इंडस्ट्रीजचा समावेश आहे. मात्र, अनेक कंपन्यात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठलीच यंत्रणा अस्तित्वात नाही. एसव्हीएस अॅक्वा कंपनीतही आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीच यंत्रणा अस्तित्वात नव्हती. साधे कार्बनडायक्साईड असलेले सिलिंडरही या ठिकाणी नव्हते. यामुळे आगीवर तातडीने नियंत्रण मिळवात आले नाही. या अौद्योगिक वसाहतीत अनेक आगीच्या घटना घडलेल्या आहेत.

उद्योगांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने प्राथमिक उपाययोजना असणे गरजेचे आहे. मात्र, पिरंगुट येथे अनेक छोट्या कंपन्यांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या यंत्रणा कार्यन्वित नाही. या वसाहतीत यापूर्वीही आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून या संदर्भात कुठलीच दखल घेतली जात नाही. यामुळे या घटना सातत्याने होत आहे. या संदर्भात येथील कंपन्यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे. मात्र, त्यांची उपेक्षाच झाली आहे. एमआयडीसी नसल्याने पायाभूत सुविधांचाही अभाव या ठिकाणी आहे. यामुळे योग्य सुविधा मिळत नसल्याची तक्रार येथील कंपन्यांची आहे.

Web Title: Many companies in the Pirangut area do not have a fire system