शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीसाठी पुणे काँग्रेसकडून विविध समित्या स्थापन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 11:19 IST

उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी प्रचाराचे नियोजन केले जात आहे.

ठळक मुद्देया समित्यांमध्ये जुन्या-नव्यांना संधी देत निवडणुकीत आघाडी घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू

पुणे : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विविध समित्या स्थापन करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार प्रचार, वक्ते, आघाडी समन्वय, सोशल मीडिया, जाहिरनामा अशा विविध समित्या बनविल्या आहेत. या समित्यांमध्ये जुन्या-नव्यांना संधी देत निवडणुकीत आघाडी घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.निवडणुकीच्या नियोजनाच्या तयारीसाठी रविवारी काँगेस भवन येथे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन, उल्हास पवार, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, आबा बागुल, नीता रजपूत, रशिद शेख, सदानंद शेट्टी, गोपाळ तिवारी, अजित दरेकर, दत्तात्रय गायकवाड, डॉ. सतिश देसाई, दत्ता बहिरट, काका धर्मावत, अविनाश बागवे, लता राजगुरू, मनिष आनंद, वैशाली मराठे, रफिक शेख, विशाल मलके, सोनाली मारणे, भुषण रानभरे, शिवाजी केदारी आदी उपस्थित होते. बागवे यांच्यासह डॉ. महाजन व उल्हास पवार यांनी मार्गदर्शन केले. बैठकीमध्ये विविध समित्यांची माहिती दिली. प्रचारासाठी पक्षाच्या आदेशानुसार विविध समित्या गठित केल्या आहेत. विधानसभा निहाय प्रमुख व निरिक्षक नेमले आहेत. विधानसभा प्रमुख व निरिक्षकांकडून विधानसभा मतदार संघातील ब्लॉक कमिटी व वॉर्ड कमिटीची बैठक घेतली जाईल. त्यांच्या बुथमधील माहिती घेऊन त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबविणार आहे. जाहिरनामा, सभांसह सोशल मीडियावरही भर दिला जाणार आहे, असे बागवे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेला उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार यावेळी केला.-उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी प्रचाराचे नियोजन केले जात आहे. वक्ते, सभा ठरविणे, सोशल मीडियाचा वापर, जाहीरनामा तयार करणे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील समन्वय यांसह विविध समित्या स्थापन केल्या आहेत. त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाईल.  

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस