शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या नवनियुक्त अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यासमोर अनेक आव्हाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 13:15 IST

पीएमपीएमएलमधील मनमानी कारभाला चाप लावण्यासाठी तत्कालीन सीएमडी तुकाराम मुंढे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पीएमपीची बसलेली घडी आता विस्कटू न देण्याचे आव्हान नवनियुक्त सीएमडी नयना गुंडे यांच्यासमोर असणार आहे. 

ठळक मुद्देकंपनी कायदा अस्तित्वात असताना एकाधिकारशाही पद्धतीने येथील सुरू होते कामकाजमुंढे यांची बदली झाल्याने महामंडळातील कामचुकार अधिकारी-कर्मचारी पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपीएमएल) मनमानी कारभाला चाप लावण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) तुकाराम मुंढे यांनी १० महिन्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे महामंडळाचे चाक काहीसे रुळावर आले होते. पीएमपीची बसलेली घडी आता विस्कटू न देण्याचे आव्हान नवनियुक्त सीएमडी नयना गुंडे यांच्यासमोर असणार आहे. कंपनी कायदा अस्तित्वात असताना एकाधिकारशाही पद्धतीने येथील कामकाज सुरू होते. त्यास मुंढे यांनी चाप लावला असून प्रत्येक कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून राजकीय हस्तक्षेपदेखील बंद केला आहे. दरम्यान, मुंढे यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली झाल्याने महामंडळातील कामचुकार अधिकारी व कर्मचारी पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. या सर्वांना त्यांच्या जागेवरच ठेवून प्रवासीहिताचे निर्णय घेण्याचे आव्हान गुंडे यांच्यासमोर राहील. तसेच दैनंदिन प्रवासीसंख्या, उत्पन्न व मार्गावरील बसची संख्या वाढविणे त्याचबरोबर ब्रेक डाऊन, प्रवाशांच्या तक्रारी, डेड किलोमीटर, प्रतिबस अनावश्यक खर्च कमी करण्याचे कामदेखील गुंडे यांना प्रामुख्याने करावे लागणार आहे़

गित्ते यांच्याकडे पदभार तुकाराम मुंढे यांची बदली केल्यानंतर पीएमपीचे सीएमडी पद रिक्त झाल्याने त्या पदावर नवनियुक्त अध्यक्ष नयना गुंडे यांची नियुक्ती केली आहे. त्या १४ फेब्रुवारीदरम्यान पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात पीएमपीच्या प्रशासकीय कामकाजात अडथळ येऊ नये, म्हणून पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे  अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलKiran Gitteकिरण गित्तेPMRDAपीएमआरडीए