शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

चाकणच्या औद्योगिक वसाहतीत एटीएममध्ये घडवून आणलेल्या स्फोटात तब्बल २८ लाख लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 14:10 IST

चाकण औद्योगिक वसाहतीतील भांबोली गावच्या हद्दीतील पिंजण यांच्या बिल्डिंगमध्ये एटीएम मशीनचा बॉम्ब सदृष्य वस्तूने स्फोट घडवून आणलं होता

ठळक मुद्देएटीएम मशीन उडवताना मोठा स्फोट मशीनच्या फुटलेल्या भागात १० ते ११ लाख रुपये सुरक्षित राहिले

चाकण : खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील भांबोली येथील वासुली फाटा - चाकण मार्गालगतच्या एका बिल्डिंगमधील एटीएम मशीनचा बॉम्ब सदृष्य वस्तूने स्फोट चोरटयांनी घडवून आणला होता. मंगळवारी मध्यरात्री घड्लेल्या या प्रकारात तब्बल २८ लाख रुपयांची रक्कम लंपास झाल्याचे समोर आले आहे. 

चाकण औद्योगिक वसाहतीतील भांबोली गावच्या हद्दीतील पिंजण यांच्या बिल्डिंगमध्ये हिताची कंपनीचे एटीएम मशीन आहे. औद्योगिक वसाहतीमधील रहदारीच्या ठिकाणी हे एटीएम मशीन असल्याने नेहमीच पैसे काढण्यासाठी लोकांची वर्दळ असते. त्यामुळे या एटीम मशिममध्ये सतत लाखो रुपयांची रक्कम भरलेली असते.

मंगळवारी रात्रौ दीड ते दोनच्या दरम्यान  अज्ञात चोरट्यांनी हिताची कंपनीचे असलेले हे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी बॉम्ब सदृष्य वस्तूने उडवून दिले. रात्रीच्या वेळी सिलेंडर फुटल्यासारखा आवाज झाल्याने मालक पिंजण यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता, समोर उभे असलेल्या चोरट्याने उसको गोली मारो अस म्हणल्यावर पिंजण आपल्या घरात गेले. त्यानंतर संबधीत चोरट्यानी काही रक्कम घेऊन पोबारा केला.

एटीएम मशीन उडवताना मोठा स्फोट घडवून आणला आहे. यामुळे एटीएम मशीनचा समोरील भाग उडून गेला आहे. तसेच एटीएम मशीनच्या समोरचा पत्रा दूर उडून पडला. तर काचांचा चक्काचूर झाला आहे. मशिनमधील काही रक्कम बाहेर फेकली गेली होती. तर मशीनच्या फुटलेल्या भागात १० ते ११ लाख रुपये सुरक्षित राहिले आहेत .

तर मशीनमधील तब्बल २८ लाख रुपये चोरीला गेले आहे. दरम्यान काळात अधिक तपास करण्यासाठी श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे अन्य सहकारी करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणMIDCएमआयडीसीPoliceपोलिसatmएटीएमArrestअटक