ओतूर परिसरात शुक्रवारी तब्बल १९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:13 IST2021-09-18T04:13:26+5:302021-09-18T04:13:26+5:30

शुक्रवारी खामुंडी ८़़, तूर २, नेतवड माळवाडी ४, उदापूर २, रोहकडी २, डिंगोरे १ असे १९ नवीन रुग्ण सापडले ...

As many as 19 patients in Ootur area on Friday | ओतूर परिसरात शुक्रवारी तब्बल १९ रुग्ण

ओतूर परिसरात शुक्रवारी तब्बल १९ रुग्ण

शुक्रवारी खामुंडी ८़़, तूर २, नेतवड माळवाडी ४, उदापूर २, रोहकडी २, डिंगोरे १ असे १९ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परिसरातील बाधितांची संख्या ३ हजार ३१० झाली आहे. त्यापैकी ३ हजार ७४ बरे झाले आहेत. ७४ जण क़ोविड सेंटरमध्ये तर, ३७ जण घरीच उपचार घेत आहेत. ११५ जणांचा मृत्यू झाला आहे.

खामुंडी येथील १६९ पैकी १४९ बरे झाले आहेत. १२ जण घरीच उपचार घेत आहेत. ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ओतूर शहरातील १ हजार ३८८ पैकी १ हजार ३०२ बरे झाले आहेत. ४४ जण उपचार घेत आहेत. ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. नेतवड माळवाडी येथील ११६ पैकी ९९ बरे झाले आहेत. १० जण उपचार घेत आहेत. ४ जणांचा मृत्यू झाला आहे. उदापूर येथील ३२५ पैकी २९७ बरे झाले आहेत. १७ जण उपचार घेत आहेत. ११ जणांचा मृत्यू झाला आहे. रोहोकडी येथील ९७ पैकी ९२ बरे झाले आहेत. १ जण उपचार घेत आहे. ४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती दिली आहे.

Web Title: As many as 19 patients in Ootur area on Friday