शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

मंथनमधून घडले कथक नृत्याच्या सामर्थ्याचे दर्शन; 'उद्गार'च्या दशकपूर्तीनिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:14 PM

उद्गारतर्फे झालेल्या मंथन मैफलीतून कथक कलेच्या सामर्थ्याचे साक्षात दर्शनच कथक नृत्यांगना आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी घडविले. 

ठळक मुद्देआसावरी पाटणकर आणि मुग्धा पाटणकर यांच्या सादरीकरणाने मैफलीची सुरुवातव्यक्त करण्यास अतिशय अवघड असणाऱ्या या रचनेस केदार पंडित यांनी केले संगीतबद्ध

पुणे : हळुवार अभिनयातून रसिकांना भुरळ पाडणारी  ‘राधा’ तर कधी सारंगीच्या तालावर ठेका धरणारी नर्तिका, आपल्या कर्माची जाणीव करून देतानाच मानसिक रुग्णांच्या भावना नृत्य अभिनयातून उलगडून अंतर्मुख करायला लावणारी नृत्यात्मिका अशा विविध रचना एकाच रंगमंचावरून अनुभवताना रसिकांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फिटले. निमित्त होते उद्गारतर्फे झालेल्या मंथन मैफलीचे. या मैफलीतून कथक कलेच्या सामर्थ्याचे साक्षात दर्शनच कथक नृत्यांगना आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी घडविले. तीन वेगळे ताल त्यांचे वेगळे स्वभाव तरी त्यांना एकत्रित बांधण्याची ‘त्रिविधा’ ही संकल्पना आणि यास नृत्याविष्कारातून प्रत्यक्षात साकारणाऱ्या कथक नृत्यांगना आसावरी पाटणकर आणि मुग्धा पाटणकर यांच्या सादरीकरणाने मैफलीची सुरुवात झाली. यानंतर ‘चैतन्य’ ही अतिशय वेगळ्या धाटणीची नृत्यरचना स्वरमंचावर सादर झाली. ‘स्क्रिझोफ्रेनिया’ या रुग्णांना समाजातील घटकांतून मिळणारा दुजाभाव तर याच समाजातून मिळणारा आधार आणि आपलेपणा अशी संमिश्र मानसिकता आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी नृत्य, भाव आणि अभिनयाच्या रूपातून अचूकपणे मांडली. व्यक्त करण्यास अतिशय अवघड असणाऱ्या या रचनेस केदार पंडित यांनी संगीतबद्ध केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नृत्याविष्काराच्या रूपाने अवतरलेली ‘राधा’ रसिकांना विशेष भावली. राधेच्या तीन अवस्था मुग्धा, मध्यम व प्रौढावस्था व श्रीकृष्णाच्या अवतार कार्यामधील तिचे स्थान उलगडण्याचा प्रयत्न आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी या नृत्यात्मिकेतून केला. प्रसिद्ध सारंगीवादक संदीप मिश्रा यांचे सारंगी वादन,‘सारंगी’ ही नृत्यरचना दृकश्राव्य माध्यमातून अनुभवताना रसिक अधिकच सुश्राव्य भासले. त्यानंतर सादर झालेली ‘कर्म’ ही रचना पाहताना प्रेक्षक सुन्न झाले. मानवी मनाच्या सुष्ट व दुष्ट अवस्था व कर्मयोगाचे महत्त्व या गोष्टी ‘कर्म’ रचनेच्याद्वारे उद्गारच्या नृत्यांगनांनी अभिनय व नृत्यविष्कारातून उलगडल्या. यासाठी संहितालेखन शैलेश कुलकर्णी व संगीत दिग्दर्शन केदार पंडित यांनी केले, तर कथक नृत्यांगना मनीषा अभय व आभा वांबुरकर यांचाही विशेष सहभाग होता. ध्वनिमुद्रित स्वरूपात या पाच रचनांचे सादरीकरण झाले. नृत्यरुपी ‘मंथना’तून अनेक रत्नांचे दर्शन या अनोख्या मैफलीतून रसिकांना घडले. आनंद देशमुख यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. आसावरी पाटणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मंथन’ मैफलीने रसिकप्रेक्षकांची मने जिंकली. 

टॅग्स :Puneपुणे