शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून केरळच्या सीमेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:04 IST

केरळ ते कर्नाटक किनारपट्टीच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीत पाऊस होण्याची शक्यता आहे़.

ठळक मुद्देमंगळवारी आगमनाची शक्यता, मायाबाजार, अंदमान निकोबार बेट तसेच अरबी समुद्रातही आगेकूच

पुणे : मान्सूनने सोमवारी जोरदार वाटचाल करीत केरळच्या सीमेपर्यंत धडक मारली असून येत्या २४ तासात तो केरळ, तामिळनाडुतील अनेक भागांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे़. भारतीय हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सूनचे केरळला आगमन होणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता़. हा अंदाज यंदा बरोबर ठरला असून मंगळवारी मान्सून केरळमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकुल परिस्थिती आहे़. मान्सूनने सोमवारी जोरदार वाटचाल करीत बंगालचा उपसागरात खोलवर मुसंडी मारली़. मायाबाजार, अंदमान निकोबार बेट तसेच अरबी समुद्रातही आगेकूच केली आहे़. केरळ ते कर्नाटक किनारपट्टीच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीत पाऊस होण्याची शक्यता आहे़. काही दिवसांपूर्वीच स्कायमेट या संस्थेने मान्सून दि. २८ मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सून येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.  मागील काही वर्षांचे चित्र पाहिल्यास यंदा मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. मॉन्सून दरवर्षी सर्वसाधारणपणे दि. १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तर अंदमानमध्ये दाखल होण्याची तारीख २० मे आहे. परंतु, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने अंदमानच्या दक्षिण समुद्रात मान्सूनचे आगमन यंदा उशिरा झाले होते़. चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर त्याने वेगाने वाटचाल केली़. भारतीय हवामान विभागाकडून मागील काही वर्षांत जाहीर केलेला मान्सूनचा अंदाज खरा ठरला आहे. केवळ २०१५ मध्ये हा अंदाज चुकला होता. यावेळी विभागाने दि. ३० मे रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, असे जाहीर केले होते. पण त्यावर्षी मान्सूनचे आगमन सहा दिवस उशिराने दि. ५ जून रोजी झाले होते. मागील वर्षी दि. ३० मे रोजी केरळात मान्सून दाखल झाला होता. तसेच हवामान विभागानेही ३० मे हा अंदाज व्यक्त केला होता. तर २०१३, २०१४ व २०१६ च्या अंदाजात केवळ १-२ दिवसांचा फरक होता. त्यामुळे यंदाही हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास मागील सहा वर्षांत पहिल्यांदाच मान्सून लवकर दाखल झाला असे म्हणता येईल़.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसkeralकेरळTamilnaduतामिळनाडू