शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत मनोज जरांगे-पाटलांची जाहीर सभा होणार; जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 18:20 IST

बारामती मधील जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार, याची सर्वांना उत्सुकता

बारामती: मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण करून मराठा आरक्षासाठी एल्गार पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (दि २०) बारामतीत सभा होणार आहे .राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात बारामती शहरातील तीन हत्ती चौक याठिकाणी त्यांची त्यांची  जाहीर सभा होणार आहे. आता जरांगे पाटील यांची तोफ बारामतीत धडाडणार असून या सभेची जय्यत तयारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या गावी अंतरावली सराटी याठिकाणी आमरण उपोषण करून राज्य शासनाला घाम फोडला होता. त्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. नुकत्याच अंतरावली सराटी याठिकाणी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. मनोज जरांगे हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी जरांगे यांनी सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, आपण २४ ऑक्टोबर नंतर एक मिनिट देखील थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. अंतरावली सराटी येथील सभेनंतर जरांगे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यात सभा होणार आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती शहरात तीन हत्ती चौक याठिकाणी दि  २० ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता सभा होणार आहे.

बारामती मधील जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. त्या ठिकाणी तब्बल १०० एकर जागा या सभेसाठी निश्चित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी सभा राजगुरुनगरला होणार असली तरी जरांगे पाटील यांच्या बारामती येथील सभेची अधिक उत्सुकता आहे. बारामती शहरात  होणाऱ्या सभेसाठी लगत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागातून मराठा समाज बांधव बांधव मोठ्या संख्येने येणार आहे. या सभेसाठी जागा कमी पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारCourtन्यायालय