शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे पाटील सकाळी लोणावळ्यात मुक्काम स्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 09:06 IST

मराठा समाज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी रात्रभर सभास्थळी शेकोट्या पेटवून बसला होता.

लोणावळा: मनोज जरांगे पाटील यांचा चौथा मुक्काम व सभा लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या वाकसई चाळ येथे बुधवारी रात्री 8.30 वाजता होणार होता. मात्र वाघोली ते लोणावळा असा प्रवास करताना मनोज जरांगे पाटील यांना तब्बल 10 तासाहून अधिक वेळ लागल्याने त्यांना मुक्काम व सभा स्थळी पोहचण्यासाठी सकाळचे 6.45 वाजले. सकाळी 6 वाजता जरांगे पाटील मावळच्या भूमीत दाखल झाले. त्यानंतर त्यांची सभा होणार आहे. 

मात्र सकल मराठा समाज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी रात्रभर सभास्थळी शेकोट्या पेटवून बसला होता. याविषयी पहाटे चार वाजता त्यांच्याशी संवाद साधला असता आमच्या मुला बाळांना आरक्षणाचा हक्क मिळावा म्हणून आमचा मनोज दादा रात्रंदिवस जागा असताना आम्हाला झोप कशी येणार अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली. वाघोली येथून काल सकाळी निघालेले मनोज जरांगे पाटील आजून जागे आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव त्यांच्या स्वागतासाठी जागोजागी थांबले आहेत.        त्यांच्या प्रेमामुळे मनोज जरांगे पाटील यांना मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी उशिर झाला. मात्र पुण्यापासून लोणावळ्यापर्यंत समाज त्यांच्या स्वागतासाठी तेवढ्यात जोशात थांबला होता. रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक मराठा समाज बांधवांचे जल्लोषात स्वागत केले जात होते. सभा स्थळी येणाऱ्या प्रत्येक बांधवाची जेवणाची, पिण्याच्या पाण्याची, चहाची व्यवस्था केली जात होती. परिसरात अस्वच्छता होऊ नये याकरिता स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली होती. थंडी जास्त असल्याने ब्लॅकेट देखील वाटप करण्यात आले. सभास्थळी पोवाडा सादर करण्यात आला. त्यामधून समाज जागृती करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मावळात खास बैलगाडी सजवण्यात आली होती. रात्रभर सकल मराठा समाजातील स्वयंसेवक नेमून दिलेल्या ठिकाणी कामे करत होते. लांबच प्रवास करून आलेले समाज बांधव मैदानात झोपले होते. मुला बाळांना आरक्षणाचा लाभ मिळावा, भविष्यात त्यांची आबाळ होऊ नये म्हणून अनेक ज्येष्ठ मंडळी देखील जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यात मुंबई च्या दिशेने निघाली आहेत. सकाळी 6 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याची गाडी सभास्थळी दाखल झाली होती.

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण