शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सर रुग्णाला बरं करतो सांगून अडीच लाखांची फसवणूक, बारामतीत मनोहरमामा भोसलेसह तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 12:30 IST

गळयावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असं सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिले

ठळक मुद्देबाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करून मनोहर मामा भोसले व त्याचे साथीदारांनी कोणाची फसवणूक वा भिती घालून पैसे देण्यास भाग पाडले तर बारामती तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

बारामती : कॅन्सर झालेल्या रुग्णास कॅन्सर बरा करतो, असं सांगून बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा.उंदरगांव ,ता. करमाळा ,जि सोलापुर)सह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशीकांत खरात (रा.साठेनगर, कसबा बारामती ता बारामती जि पुणे) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार तक्रारदार खरात यांच्या वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले भोंदुबाबाच्या मौजे सावंतवाडी, गोजूबावी( ता बारामती जि पुणे )मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडीलांचा गळयावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असं सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिले. तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगणमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकुण २,५१,५००/- रुपये त्यांचे व त्यांचे वडीलांचे जिवाचे बरे वाईट होईल अशी भिती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

याबाबत खरात यांच्या तक्रारीवरून आरोपी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगांव ता. करमाळा जि.सोलापुर), विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा , ओंकार शिंदे यांच्याविरूध्द भारतीय दंड विधान, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुश, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटण कायदा व औषधे व चमत्कारी उपाय (अक्षेपार्ह जाहीरात) अधिनियमान्वये बारामती तालुका पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे नोंद करण्यात आला आहे. बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करून मनोहर मामा भोसले व त्याचे साथीदारांनी कोणाची फसवणूक वा भिती घालून पैसे देण्यास भाग पाडले असेल. त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसArrestअटकPuneपुणे