Manipur Violence: खेडमध्ये मणिपूर घटनेचा निषेध; हुतात्मा राजगुरू पुतळ्यासमोर मूक मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 19:32 IST2023-07-25T19:31:26+5:302023-07-25T19:32:21+5:30
विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मणिपूर येथील घटनेचा निषेध केला...

Manipur Violence: खेडमध्ये मणिपूर घटनेचा निषेध; हुतात्मा राजगुरू पुतळ्यासमोर मूक मोर्चा
राजगुरुनगर (पुणे) : मणिपूरमध्ये समाजकंटकांनी महिलांची विवस्त्र धिंड काढून सामुदायिक बलात्काराचे घृणास्पद कृत्य केले आहे. याच्या निषेधार्थ राजगुरुनगर मधील सर्व संघटना हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यासमोर मूक मोर्चा काढण्यात आला
शहरातील हुतात्मा राजगुरू फाउंडेशन, किसान सभा यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मणिपूर येथील घटनेचा निषेध केला. यावेळी यावेळी हुतात्मा फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप होले, पुणे जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, कॉम्रेड रज्जाकभाई शेख, पंचायत समिती माजी सभापती सतीश राक्षे, सुरेखा क्षत्रिय,अमर टाटीया, डॉ. शीतल ढवळे, डॉ. कुंतल जाधव ॲड. मनिषा टाकळकर ,किसान सभा अध्यक्ष किसनराव ठाकूर, तालुका सचिव आमोद गरुड, हरिशभाई देखणे यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.