शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

मार्केट यार्डात आंब्याची आवक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 13:14 IST

फळबाजारात रविवारी रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकातीलआंब्यांची आवक वाढली.

ठळक मुद्देवातावरणातील बदलामुळे हापूस आंब्यांच्या उत्पादनावर परिणाम

पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकातीलआंब्यांची आवक वाढली. रत्नागिरी हापूसच्या पाच ते साडेपाच हजार पेट्यांची आवक झाली आहे़.  तर कर्नाटक हापूस, पायरी व इतर प्रकारच्या आंब्याच्या तब्बल १५ हजार पेट्या तसेच ३० हजार के्रटसची आवक झाली. वातावरणातील बदलामुळे रत्नागिरी हापूस व कर्नाटकातील हापूसच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. आंब्याच्या उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली़.यंदा फेब्रुवारी महिन्यात कर्नाटकातील आंब्यांची आवक सुरु झाली. दरम्यान तापमानातील बदल तसेच अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे कर्नाटकातील आंब्यांच्या प्रतवारीवर काहीसा परिणाम झाला आहे. आंब्यांचा आकार लहान आणि मध्यम आहे. कर्नाटकातील तुमकुर भागात आंब्यांची मोठी लागवड केली जाते. या भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी वातावरणातील बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर झाल्याचे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले़  आंब्याची आवक वाढू लागली असून ग्राहकांकडून मागणीही वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले़रत्नागिरी हापूस आंब्याचे दर पुढीलप्रमाणे-हापूस कच्चा आंबा (४ ते ८ डझन पेटी) १२०० ते ३५०० रुपये, तयार आंबा (४ ते ८ डझन पेटी) १५०० ते ३५०० रुपये़ रत्नागिरी हापूस तयार आंबा (५ ते १० डझन पेटी) २००० ते ४५०० रुपये. कर्नाटकातील आंब्यांचे दर पुढीलप्रमाणे-कर्नाटक हापूस (४ ते ५ डझन पेटी)- ८०० ते १६०० रुपये, पायरी (४ डझन पेटी) ५०० ते ८००, लालबाग- २५ ते ४५ रुपये किलो, बदाम/ बैंगनपल्ली- ३० ते ४० रुपये किलो.

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाMarket Yardमार्केट यार्ड