शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर विराजमान होणार मंडईचे 'शारदा गजानन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 20:30 IST

अखिल मंडई मंडळाचा १२९ वा गणेशोत्सव यंदा उत्साहात साजरा करण्यात येणार

पुणे : अखिल मंडई मंडळाचा १२९ वा गणेशोत्सव यंदा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रंगबेरंगी आरसे आणि झुंबराने सजलेल्या भव्य स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर शारदा गजानन विराजमान होणार आहेत. गणेश चतुर्थीला बुधवार, दिनांक ३१ ऑगस्ट  रोजी दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रतापकाका अनंत गोगावले आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गोगावले यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होईल, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या १० दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग,सायंपूजा आणि संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे.

अण्णा थोरात म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातून शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त येतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी मंदिर परिसरात ३० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून बाऊन्सर आणि २०० सुरक्षा स्वयंसेवक काम करणार आहेत.

गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एक वही आणि पेन देण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. वह्या आणि पेन जमा करुन पुणे आणि पुण्याबाहेरील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा बंधुभाव पुरस्कार वितरण सोहळा उत्सवकाळात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

असा असेल शारदा गजाननाचा भव्य स्वप्नमहाल

महिरपामध्ये सजलेले दिवे, मोराची भव्य कमान, रंगबेरंगी आरशांनी चकाकणारी सजावट आणि २० भव्य झुंबरांने बाप्पांचा स्वप्न महालात सजणार आहे. या महालात काल्पनिक वृक्षाला हलता झोपाळा लावण्यात येणार असून त्यावर शारदा गजानन विराजमान होणार आहेत. ३२ बाय १६ फूट असा भव्य झापोळा असणार आहे. स्वप्न महालात खांब वगळून विविध कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. विशाल ताजणेकर यांनी स्वप्न महालाचे कला दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवSocialसामाजिक