मंचरला भरदिवसा मोबाइल शॉपीत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:28 IST2020-12-13T04:28:23+5:302020-12-13T04:28:23+5:30

मंचर: शहराच्या भरवस्तीत असलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रुपेश मोबाईल शॉपी या दुकानातून १० हजार रुपये किमतीचे मोबाईल ...

Manchar was robbed in a mobile shop all day | मंचरला भरदिवसा मोबाइल शॉपीत चोरी

मंचरला भरदिवसा मोबाइल शॉपीत चोरी

मंचर: शहराच्या भरवस्तीत असलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रुपेश मोबाईल शॉपी या दुकानातून १० हजार रुपये किमतीचे मोबाईल व रोख रक्कम ३० हजार रुपये असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून भरदिवसा नेला आहे.

यासंदर्भात दुकान मालक भावेश सुरेश पुंगालिया यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भावेश पुंगालिया यांचे मंचर येथील बाजार समितीत मोबाईल शॉप आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता मोबाईल शॉपी उघडण्यासाठी गेले होते. त्यांच्या जवळ असणाऱ्या बॅगेत १० हजार रूपयांचे दोन मोबाईल होते. तसेच ३० हजार रुपये रोख होते. त्यांनी दुकान उघडून बॅग काऊंटरच्या आतील खुर्चीवर ठेवून ते बाथरूमला गेले होते. यावेळी चोरट्यांनी पुंगालिया यांनी खुर्चीवर ठेवलेली बॅग उचलून लंपास केली. पुंगालिया हे परत आल्यानंतर त्यांना खुर्चीवर बँग दिसली नाही. त्यांनी दुकानात व आजूबाजूला शोध घेतला असता बॅग सापडली नाही. यामुळे बॅग चोरी गेल्याची तक्रार त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली.

Web Title: Manchar was robbed in a mobile shop all day