शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मानाच्या गणपतींची मिरवणूक वेळेत पूर्ण करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 9:52 PM

यंदाच्या वर्षी शहरातील मानाच्या पाचही गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी एकत्र येऊन मिरवणूक कमी कालावधीत पूर्ण करणार असल्याचा निर्धार केला आहे.

ठळक मुद्देमुख्य पाच मंडळाच्या अध्यक्षांचा निर्धार : ढोल पथकांना कमी वेळ देणारएका पथकात ४० ढोल, १५ ताशे, १० ध्वजधारी आणि ३० जादा वादक असा ताफा असणार

पुणे : निर्धारित वेळेत श्रींची मिरवणूक पूर्ण व्हावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. यंदाच्या वर्षी शहरातील मानाच्या पाचही गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी एकत्र येऊन मिरवणूक कमी कालावधीत पूर्ण करणार असल्याचा निर्धार केला आहे. यामुळे सहा तासांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या मिरवणुका यावर्षी किती तासांत पूर्ण होतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  मानाच्या पाचही गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक सुंदर आणि वेळेत पार पडावी, याकरिता मानाचा दुसरा गणपती असलेल्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या उत्सव मंडपात आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे राजाभाऊ टिकार, सौरभ धडफळे, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर, नितीन पंडित यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  रविवारी (दि. २३) सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री, महापौर, आयुक्त आदी मान्यवरांच्या हस्ते गणरायाचे पूजन झाल्यानंतर प्रत्येक मानाच्या मंडळाचा गणपती १५ मिनिटाच्या अंतराने पुढे मार्गस्थ व्हावा, असा प्रयत्न यंदा राहणार आहे, असे मानाच्या पाच मंडळांच्या पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  शेटे म्हणाले, की मंडई टिळक पुतळ्यापासून ते बेलबाग चौकापर्यंत मानाच्या गणपती मंडळांना येण्याकरिता जो वेळ लागतो, तो यंदा कमी करण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याकरिता ढोल-ताशा पथके लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या बाजूला सज्ज राहणार असून तेथून बेलबाग चौकातच ती पथके मिरवणुकीत सहभागी होतील. यामुळे मंडई ते बेलबाग चौकादरम्यान लागणारा जादा वेळ कमी होणार आहे. एका पथकात ४० ढोल, १५ ताशे, १० ध्वजधारी आणि ३० जादा वादक असा ताफा असणार आहे. धडफळे म्हणाले, की मानाच्या गणपतींचे विसर्जन हौदात करण्याचा पायंडा पाडला होता. यंदादेखील तो पायंडा कायम ठेवणार असून मानाच्या गणपतीचे विसर्जन हौदात होणार आहे. पृथ्वीराज परदेशी म्हणाले, की ढोल-ताशा पथके हा मंडळांचा एक भाग आहेत. ढोल-ताशा पथके पुढे लवकरात लवकर जातील, असा प्रयत्न आहे. मात्र, पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये, असेही ते म्हणाले. खटावकर म्हणाले, की ढोल-ताशा पथकांचा सहभाग असला, तरी संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. पथकाचे पहिले आवर्तन हे टिळक पुतळ्याजवळ नाही, तर बेलबाग चौकामध्ये होईल.   

* कसे असणार नियोजन... - मानाच्या पहिल्या कसबा गणपतीनंतर १५ मिनिटांनंतर लगेच मानाचा दुसरा गणपती हा विसर्जन मिरवणुकीत येणार आहे़  तसेच ढोल पथकांची लक्ष्मी रोडवर होणारी आर्वतने ही कमी वेळेची करण्यात आली आहेत. त्याचबरोबर मिरवणुकीतील सर्व पथके ही समाधान चौकापासून मिरवणुकीत सहभागी होणार. - यंदापासून मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोलपथके समाधान चौकातून सहभागी केली जाणार- ढोल पथकांसाठी आता दहा मिनिटांच्याऐवजी तीन मिनिटांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे़  यामुळे कमीत कमी वेळेत मिरवणूक पूर्ण होण्यास मदत होईल, असे पदाधिकाºयांनी म्हटले आहे. - ढोलवादकांना लक्ष्मी रस्त्यावरील एकाही चौकात रिंगण करून ढोलवादन करता येणार नाही.  

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जन