शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

साडेदहाच्या वेळेवर मानाचे गणपती ठाम : हस्तक्षेप केल्यास मूर्ती विसर्जित न करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 14:56 IST

वाद चिघळण्याची चिन्हे...

ठळक मुद्देविसर्जन मिरवणूक प्रारंभाचा वेळ बदलणार नाहीमानाच्या मंडळांनी आपली भूमिका स्पष्ट करताना दिले इतिहासातील दाखले

पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सकाळी साडेदहा वाजताच सुरू करण्यावर मानाचे पहिली पाच गणपती मंडळे ठाम आहे. परंपरेप्रमाणे सुरू असलेल्या या मिरवणुकीत बदल केल्यास आम्ही आमच्या श्रीं च्या मूर्ती विसर्जित करणार नाही, असा इशारा या मंडळांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे़. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गुरूजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट व श्री केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांनी लेखी पत्राव्दारे आपले म्हणणे पोलिसांना कळविले आहे़. आपली भूमिका स्पष्ट करताना या मंडळांनी इतिहासातील दाखले देऊ केले आहेत़. गणेशोत्सव व त्याची विसर्जन मिरवणुकीने होणारी सांगता याने शहराची ओळख संपूर्ण जगात झाली आहे़. ही विसर्जन मिरवणूक सुनियोजित व शिस्तबध्द व्हावी़, यासाठी लोकमान्य टिळक यांनी १२६ वर्षांपूर्वी त्यांच्या सहकाऱ्यांशी सल्ला मसलत करून मिरवणुकीत प्रमुख मंडळांनी सहभागी होण्यासाठीची तर्कसंगत क्रमवारी निश्चित केली आहे़. मानाचे पाच गणपती ही मिरवणूक याच तर्कसंगत क्रमवारीनुसार कायदा व सुव्यवस्थेला बाधा न आणता अव्याहतपणे सुरू आहे़. परंतू या सुव्यवस्थेला छेद देण्याविषयीची चर्चा सध्या सुरू असून, यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे़. ही असंदिग्धता उत्सव काळात कायम राहिली अथवा वरील विसर्जन मिरवणुकीच्या सुव्यवस्थेत बदल केल्यास आम्ही आमच्या श्रीं च्या मूर्ती विसर्जित करणार नाही़. तसेच असे झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पुण्यातील ऐतिहासिक व वैभवशाली मिरवणुकीस गालबोट लागेल़. याबाबतीत प्रशासनाने आमच्यावर अकारण दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या श्रींच्या मुर्तींचे विसर्जन करणार नाही, असेही या मंडळांनी स्पष्ट केले आहे़. दरम्यान पोलिसांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही या मंडळानी या पत्रद्वारे केले आहे़. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस