शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या मृत्यूनंतर नराधमाचा १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; सावत्र बापाला जन्मठेप

By नम्रता फडणीस | Updated: April 10, 2025 20:26 IST

सावत्र वडिलांबरोबर राहत असताना तिच्यावर बापाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर तिला मारून टाकीन, अशी धमकी दिली होती

पुणे : आईच्या मृत्यूनंतर सावत्र बापानेच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. मारहाणही करत असे. हा त्रास असह्य झाल्याने अल्पवयीन मुलीने घरातून पळ काढत कॅफे गाठले आणि लोकांची मदत मागितली. पीडितेने सावत्र बापाविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. अखेर आरोपी सावत्र बापाला विशेष न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी जन्मठेप आणि ७० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पीडित मुलगी, डॉक्टर तसेच कॅफे मधील मदत करणारा व्यक्ती यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

पीडित मुलीला ७० हजार रुपयांची रक्कम देण्यात यावी. तसेच पीडित मुलीला मनोधैर्य योजनेअंतर्गत भरपाई देण्यासंबंधी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला आदेशात सूचित केले आहे. या घटनेच्या वेळी पीडित मुलीचे वय १५ वर्षे होते. सावत्र वडिलांबरोबर राहत असताना तिच्यावर बापाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर तिला मारून टाकीन, अशी धमकी दिली होती.

पीडित मुलीला आरोपीने फ्रिजची चावी जमिनीवर पडल्यावरून तिचे डोके फ्रिजवर आपटून तिला मारहाण केली. पीडित मुलीने घाबरलेल्या अवस्थेत घरातून पळ काढला. एका कॅफेमध्ये जाऊन तेथील लोकांना मदत मागितली. तेथील लोकांनी तिला मदत केली. त्यानंतर पीडितेने तिच्या सावत्र बापाविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर तपास वाकड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळवत त्याच्यावर दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रह्मे यांनी एकूण ६ साक्षीदार तपासले. आरोपीच्या वतीने बचावासाठी ५ साक्षीदार तपासण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक. पोलिस उपनिरीक्षक एस. जी. गोडे यांनी केला असून, खटल्यात पोलीस कर्मचारी डी. एस. पांडुळे व निलेश दरेकर यांनी कोर्ट कामकाजात मदत केली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे कोर्टाने आरोपीस दोषी धरत वरील शिक्षा सुनावली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसFamilyपरिवारCourtन्यायालयArrestअटक