शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात महिलांसाठीच्या '' तेजस्विनी '' बसमध्ये पुरुषांची घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 11:44 IST

महिला प्रवाशांसाठी सुरू केलेली ' तेजस्विनी' ही विशेष बससेवा फक्त कागदावरच उरल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देगर्दीच्या वेळीही पुरूष प्रवाशांचा भरणा सकाळी ११ ते ५ यावेळेतच बसमध्ये पुरूष प्रवाशांना प्रवास करता येईल, असा निर्णयमहिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पीएमपीच्या एकुण ६६ बसमार्फत तेजस्विनी ही सेवा

पुणे : महिला प्रवाशांसाठी सुरू केलेली ' तेजस्विनी' ही विशेष बससेवा फक्त कागदावरच उरल्याचे चित्र आहे. सकाळी ११ ते ५ यावेळेतच बसमध्ये पुरूष प्रवाशांना प्रवास करता येईल, असा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने घेतला आहे. पण गर्दीच्यावेळीही या बसमध्ये पुरूष प्रवाशांचा भरणा दिसून येत आहे.महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पीएमपीच्या एकुण ६६ बसमार्फत तेजस्विनी ही सेवा पुरविली जात आहे. एकुण ३६ मार्गांवर या बस धावत आहेत. मागील वर्षी जागतिक महिला दिनापासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला पीएमपीच्या ताफ्यात नव्याने आलेल्या ३३ मिडी बस तेजस्विनी म्हणून सोडण्यात येत होत्या. आता त्यामध्ये राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या ३३ बसही या सेवेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपर्यंत या बस केवळ महिला प्रवाशांसाठीच राखीव होत्या. गर्दीच्यावेळी सकाळी व सायंकाळी महिला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळतो. मात्र दुपारच्या सत्रामध्ये बहुतेक बस रिकाम्या धावत होत्या. त्यामुळे या बस तोट्यात चालल्या होत्या. यापार्श्वभुमीवर पीएमपीने सुरूवातीला केवळ सकाळी ११ ते ५ या वेळेत मिडी बसमध्ये पुरूष प्रवाशांनाही प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. तर काही दिवसांपुर्वी राज्य शासनाने दिलेल्या बसमध्येही पुरूष प्रवाशांना प्रवेश देण्यास सुरूवात झाली. पण, पीएमपीने निश्चित केलेल्या वेळेव्यतिरिक्तही या बसमध्ये पुरूष प्रवासी प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. सकाळी ११ वाजेपर्यंत व सायंकाळी पाच वाजल्यानंतर प्रामुख्याने महिला प्रवाशांची गर्दी असते. यामध्ये नोकरदार महिला, ज्येष्ठ महिला, विद्यार्थिनींचा समावेश असतो. पण पुरूष प्रवासीही बसमध्ये चढत असल्याने या बसेसच्या वेगळेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. ------------दोन दिवसांपुर्वी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीएमपी प्रवासी मंचच्या सदस्य आशा शिंदे यांना हडपसर येथील गाडीतळावर तेजिस्विनीबाबत आलेल्या अनुभव त्यांनी सांगितला. ही बस वारजे माळवाडीला जाणार होती. त्यामध्ये पहिल्याच फेरीत पुरूष प्रवासीही बसमध्ये चढले. याबाबत महिला वाहकाला विचारले असता ही गाडी जाताना जनरल प्रवाशांसाठी असते. वारजे माळवाडी येथून येताना केवळ महिला प्रवाशांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी मार्गफलकाच्या एका बाजूला महिलांसाठी असे नमुद करण्यात आले आल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे सकाळी ११ ते ५ यावेळेचा पीएमपीचा दावा पोकळ असल्याचे स्पष्ट होते.------------तेजस्विनी बसमध्ये सकाळी ११ ते ५ यावेळेत पुरूष प्रवाशांनाही प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. पण गर्दीच्या वेळी केवळ महिला प्रवासीच प्रवास करू शकतात. तशा सुचना वाहकांना दिल्या आहेत. पण यावेळेतही पुरूष प्रवास करत असतील तर सूचना दिल्या जातील.- नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलWomenमहिलाNayana Gundeनयना गुंडे