शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

सार्वजनिक ठिकाणी घाण करणे अडीच हजाराहून अधिक नागरिकांना पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 19:24 IST

पुणे महानगरपालिकेच्या घणकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या नागरिकांवर कठाेर कारवाई करण्यात येत अाहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत.

पुणेपुणे महानगरपालिकेच्या घणकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या नागरिकांवर कठाेर कारवाई करण्यात येत अाहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. त्यानुसार 2 नाेव्हेंबर ते 23 नाेव्हेंबर या दरम्यान पालिकेकडून तब्बल 2858 नागरिकांवर कारवाई करण्यात आली अाहे. त्यांच्याकडून 5 लाख 29 हजार 635 रुपये इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे.     सार्वजनिक ठिकाणी नागरिकांंकडून अनेकदा अस्वच्छता पसरवली जाते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची संख्या तर सर्वाधिक अाहे. या अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांमुळे शहर विद्रुप हाेत असते. पुणे शहराचे घाेषवाक्य हे स्वच्छ पुणे सुंदर पुणे असे अाहे. त्यामुळे हे घाेषवाक्य सत्यात उतरविण्यासाठी पुणे महानगरपालिका अाता सज्ज झाली अाहे. पालिकेकडून अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर अाता दंडात्मक कारवाई करण्यात येत अाहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा फेकणे, लघवी करणे, शाैचास बसणे अादी गाेष्टींसाठी कारवाई करण्यात येत अाहे. महापालिकेकडून माेहिमच हाती घेण्यात अाली असून प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही स्वच्छता माेहिम राबविण्यात येत अाहे. पालिकेकडून 2 नाेव्हेंबर ते 23 नाेव्हेंबर या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 1713 नागरिकांवर कारवाई करण्यात अाली अाहे. त्यांच्याकडून 2 लाख 97 हजार 165  इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे. तसेच या सर्व नागरिकांकडून चक्क रस्ता साफ करुन घेण्यात अाला. याच कालावधित सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्या 1101 नागरिकांकडून तब्बल 2 लाख 24 हजार 660 इतका दंड वसूल करण्यात अाला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या 42 जणांकडून 6 हजार 810 तर शाैचास बसणाऱ्या 2 जणांकडून एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. 

    याबाबत बाेलताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्वर माेळक म्हणाले, दाेन नाेव्हेंबरपासून पालिकेच्या घणकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत अाहे. सध्या 6 लाखापर्यंत दंड वसूल करण्यात अाला आहे. दंड हा प्रतिकात्मक अाहे. नागरिकांमध्ये जागृती व्हावी व त्यांनी पुण्याला स्वच्छ ठेवण्यास पालिकेला मदत करावी याहेतूने ही माेहिम हाती घेण्यात अाली आहे. लक्ष्य स्वच्छ पुणे सुंदर पुणे या माेहिमेसाठी सध्या तब्बल 750 अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या अाहेत. सध्या सुरु असलेल्या कारवाईमुळे शहरात चांगलाच गुणात्मक फरक पडलेला दिसून येत अाहे. यापुढील काळात देखिल ही कारवाई अशीच सुरु राहणार अाहे. नागरिकांना अावाहन अाहे की त्यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवावी तसेच घरातील कचरा पालिकेकडून नेमण्यात अालेल्या स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना अाेला व सुका असा वेगळा करुन द्यावा. तसेच ज्यांच्या घरी हे स्वच्छचे कर्मचारी कचरा घेण्यासाठी येत नाहीत त्यांनी त्यांच्या घराजवळील अाराेग्य काेठीला भेट देऊन याबाबतचा अर्ज करावा. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानPuneपुणे