शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात पोलिसांची मोठी कारवाई : सराईत ५ गुन्हेगारांकडून तब्बल १८ पिस्तुले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 21:43 IST

एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने पिस्तुल पकडली जाण्याची ही पुणे शहरातील पहिलीच मोठी कारवाई आहे. हडपसर पोलिसांची कामगिरी 

ठळक मुद्देहडपसर पोलिसांची कामगिरी ; तब्बल १८ गावठी पिस्तुले व २७ काडतुसे जप्त

पुणे : मध्य प्रदेशातून शस्त्रास्त्रे आणून पुणे शहर व जिल्ह्यात विक्री करणाऱ्या एका टोळीला हडपसर पोलिसांनी पकडले आहे.या टोळीतील ५ सराईत गुन्हेगारांकडून तब्बल १८ गावठी पिस्तुले व २७ काडतुसे जप्त करण्यात आली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने पिस्तुल पकडली जाण्याची ही पुणे शहरातील पहिलीच मोठी कारवाई आहे.अरबाज रशीद खान (वय २१, रा. शिरुर), सुरज रमेश चिंचणे ऊर्फ गुळ्या (वय २१, रा. गंगानगर, फुरसुंगी), कुणाल नामदेव शेजवळ ऊर्फ यश (वय १९, रा. शिरुर), जयेश राजू गायकवाड (वय २३, रा. येरवडा), शरद बन्सी मल्लाव (वय २१, रा. काचेआळी, शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण हे त्यांच्या पथकासह हडपसर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक नितीन मुंढे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक सौरभ माने, हवालदार प्रताप गायकवाड, नितीन मुंढे, विनोद शिवले, अकबर शेख, शाहीद शेख, शशीकांत नाळे, प्रशांत टोणपे यांनी फुरसुंगी येथील कानिफनाथ वस्तीजवळ सापळा रचला़ तेथे मोटारसायकलसह थांबलेल्या ५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत १८ गावठी पिस्तुले व २७ काडतुसे असा ५ लाख ६८ हजारांचा शस्त्रसाठा मिळाला. हे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी पुणे शहर व पुणे जिल्ह्यात पिस्तुल तस्करीचे, मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत़ अरबाज खान हा मंचर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात फरार होता. ......

मध्य प्रदेशातून पिस्तुलाची तस्करीशिरुर येथे राहणारा अरबाज खान हा या टोळीचा प्रमुख आहे. तो मध्य प्रदेशातून पिस्तुलाची तस्करी करुन पुण्यात आणतो. आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याने यापूर्वी पुणे शहर, ग्रामीण, अहमदनगर, शिरुर येथे विक्री केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.शिरुर तालुक्यात खान याला पिस्तुल मॅन आणि विकास तौर याला महाराज या नावाने गुन्हेगारी विश्वास ओळखले जाते. ़़़़़़़़़अनेक गुन्ह्यात यांच्या पिस्तुलांचा वापर पुणे शहर व जिल्ह्यात झालेल्या गोळीबाराच्या अनेक गुन्ह्यात या टोळीने तस्करी करुन आणलेल्या पिस्तुलांचा वापर करण्यात आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळेच या टोळीने यापूर्वी कोणा कोणाला ही पिस्तुले विकली, याचा तपास करण्यात येत असून ही पिस्तुले यापूर्वी वापरण्यात आली आहेत का याची तपासणी फॉरेन्सिक विभागाकडून करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक