शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई ; १३० एकरावरील अतिक्रमण काढण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 13:20 IST

पुढील तीन दिवसात तालुक्यातील शेतकऱ्यांनी वन क्षेत्रावर केलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढताना राज्य राखीव दलातील पोलिस कर्मचाऱ्यांची मदत

इंदापूर (शेटफळगढे) : पिंपळे (ता. इंदापूर) वन विभागाने साडे अकरा हेक्टर डाळींब व उस शेतीचे अतिक्रमण काढण्यात आले. त्याच बरोबर तालुक्यातील वन विभागाच्या मालकीच्या १३० एकर शेत जमिनीवर पाच गावातील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. हे १३० एकर शेत जमिनीवरील अतिक्रमण येत्या तीन दिवसात काढले जाणार आहे. याची सुरुवात पिंपळे (ता. इंदापूर) येथून आजपासून करण्यात आली आहे. पिंपळे येथील शेत जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई पूर्ण केल्यानंतर पुण्याचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मारणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात पुण्याचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर व उप वनसंरक्षकयांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रा वरील अतिक्रमण काढण्यात येत आहे. यानुसार पिंपळे  येथील वनक्षेत्र वनसंवर्धन कायदा झाल्यानंतर कायदाझाल्यानंतर महसूल विभागाने  वाटप केले होते. मात्र यामुळे १९८० च्या वनसंवर्धन कायद्याचा भंग झाला होता.  त्यामुळे  पिंपळे महसूल विभागाने वाटप केलेली क्षेत्र अतिक्रमण गृहीत धरून काढण्यात आले येथील १३० एकर क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. यात डाळिंब मका कडवळ या व इतर पिकांचा समावेश होता.

यानंतर  वन विभागाच्या सीमा देखील निश्चित करण्यात आल्या. याशिवाय पुढील तीन दिवसात तालुक्यातील राजवडी, लासुरणे,गोखळी, वरकुटे खुर्द येथील शेतकऱ्यांनी वन क्षेत्रावर केलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे. पिंपळे येथील जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढताना राज्य राखीव दलातील पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. या कारवाईत ७० वन कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी इंदापूरचे वन क्षेत्रपाल राहुल काळे यांचेसह महादेव हजारे, जयश्री जगताप,  मुकेश सणस, आदी तालुका वन क्षेत्रपाल यांनीया कारवाई त सहभागी होते.-------------------------------------

टॅग्स :IndapurइंदापूरFarmerशेतकरीEnchroachmentअतिक्रमणforest departmentवनविभाग