शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विधीसंघर्षग्रस्त मुलांना आणणार मुख्य प्रवाहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 11:18 IST

पुणे शहरात सुमारे १६०० विधीसंघर्षग्रस्त मुले आहे़...

ठळक मुद्देशिक्षण व स्वयंरोजगारासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत मुलांना प्रत्यक्ष स्वयंरोजगार अथवा नोकरीसाठी प्रयत्न करण्यात येणार

पुणे : विधीसंघर्षग्रस्त मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग रोखून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शहर पोलीस दलाकडून करण्यात येत आहे़. त्याचाच एक भाग म्हणून त्यांचे शिक्षण व स्वयंरोजगारात मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे़. पुणे शहरात सुमारे १६०० विधीसंघर्षग्रस्त मुले असून त्यांना पोलीस ठाण्याच्या पातळीवर मार्गदर्शन देण्यास सुरुवात करण्यात आली आहे़. त्यात मुलांबरोबर पालकही सहभागी होतात़ पोलीस ठाण्यातून बोलावणे आल्यावर प्रथम मुलांना संशय येतो़. मात्र, इथे आल्यावर आपल्याला गुन्ह्यासाठी बोलावले नसून त्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी बोलाविण्यात आल्याचे लक्षात आल्यावर त्यांचा पोलिसांवरील विश्वास वाढू लागला आहे़. लाईफ स्कुल फाऊंडेशनच्या वतीने या मुलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे़. या प्रकल्पात तीन टप्प्यात मार्गदर्शन व सल्ला दिला जाणार आहे़. पहिल्या टप्प्यात पोलीस ठाण्याच्या पातळीवर सर्वांमध्ये आपण या गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडू शकतो, असा विश्वास निर्माण करण्यात येत आहे़. त्यानंतर त्यांच्या शिक्षण व रोजगाराविषयीच्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे़. याबाबत लाईफ स्कुल फाऊंडेशनचे संस्थापक नरेंद्र गोईदानी यांनी सांगितले की, लिडरशिप ट्रेनिंगमध्ये लाईफ स्कुल गेली २० वर्षे काम करीत आहे़. या वर्षी भरोसा सेलच्या माध्यमातून पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम यांच्याशी चर्चा करताना विधीसंघर्षग्रस्त मुलांना गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या योजनेबाबत चर्चा झाली़. या मुलांना पोलीस ठाण्याच्या पातळीवर स्वयंसेवकांमार्फत मार्गदर्शन करुन त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याचे काम लाईफ स्कुल फाऊंडेशनने आपल्याकडे घेतले आहे़. संस्थेचे स्वंयसेवक पहिल्या टप्प्यात आपणही आपल्या इच्छेनुसार चांगली व्यक्ती बनू शकतो, हा विश्वास निर्माण करण्यात येणार आहे़. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत़. दुसऱ्या टप्प्यात या मुलांशी वैयक्तिक पातळीवर सर्व्हे करुन त्यांच्यात कोणते सुप्त गुण आहेत़. त्यांची आवडी निवडी काय आहेत़ त्यांना काय व्हायचे आहे, हे जाणून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे़. त्यासाठीचा सर्व शैक्षणिक खर्च संस्था उचलणार आहे़. त्यांच्या आवडीनुसार त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे़. तिसऱ्या टप्प्यात या मुलांना प्रत्यक्ष स्वयंरोजगार अथवा नोकरीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे़. त्यासाठी एसव्हीपी या स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात येत आहे़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस