शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Mahrashtra Election 2019 : मतदान करा अन एका मिसळवर एक फ्री मिळवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 15:56 IST

जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी पुण्यातील कडक मिसळ येथे एका मिसळवर एक मिसळ फ्री देण्याची ऑफर ठेवण्यात आली आहे.

पुणे : विधानसभेची निवडणुक 21 तारखेला हाेत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदानाची आकडेवारी पाहता मतदानाची टक्केवारी कमी झाली असल्याचे समाेर आले आहे. पुण्यात लाेकसभेला पन्नास टक्क्यांच्या आत मतदान झाले हाेते. कमी मतदान झाल्यास त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर हाेत  असताे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आता विविध व्यवासायिक पुढे सरसावले आहेत. पुण्यातील कडक मिसळ या ठिकाणी मतदान केल्यास एका मिसळवर एक मिसळ फ्री देण्याची ऑफर नागरिकांना देण्यात आली आहे. 

संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. मतदानाच्या माध्यमातून आपले सरकार निडवण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून मतदानाची टक्केवारी घटताना दिसत आहे. नागरिक मतदानाची सुट्टी फिरायला जाण्यासाठी किंवा सिनेमाला जाण्यासाठी वापरत आहेत. नागरिकांमध्ये मतदानाबाबत अनास्था दिसून येते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी प्रशासन माेठ्याप्रमाणावर प्रयत्न करत असते.

त्यातच आता पुण्याचे काही व्यावसायिक देखील नागरिकांना विविध ऑफर देऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. पुण्यातील काेथरुड भागात असणाऱ्या कडक मिसळ या ठिकाणी मतदान करुन आल्यास एका मिसळवर एक फ्री मिळणार आहे. परंतु यासाठी दाेन्ही नागरिकांनी मतदान करणे आवश्यक आहे. मतदान केल्याची बाेटावरची शाई दाखविल्यावरच मिसळ फ्री देण्यात येणार आहे. 

याबाबत सांगताना कडक मिसळचे केतन तेंदले म्हणाले, मतदानाचा अधिकार हा संविधानाने आपल्या सर्वांना दिलेला एक मूलभूत अधिकार आहे आणि तो प्रत्येक वेळी विचारपूर्वक वापरणे हे आपले आद्‍य कर्तव्यच आहे. ह्यामुळे लोकशाही नुसतीच टिकत नाही तर उत्स्फूर्त मतदानाचा टक्का वाढल्यावर लोकशाही आणखी सक्षम होण्याच्या दृष्टीने राष्ट्राला त्याचा निश्चितच दीर्घकालीन लाभ होतो. आम्ही देखील ह्याच भावनेने प्रेरित होऊन ह्या घटनात्मक लोक-उत्सवाला आमच्या परीने आणखी विस्तृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणुन दिनांक  २१ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करुन येणाऱ्या प्रत्येक नागरिकास आम्ही आमच्या एका कडक मिसळवर दुसरी कडक मिसळ फ्री देणार आहोत. हा संकल्प व्यावसायिक दृष्टिकोन हा मुद्दा नसुन मतदान ही एक लोक- चळवळ व्हावी हीच भावना आम्ही जपण्‍याचा आणी वाढवण्याचा प्रयत्न करित आहोत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019foodअन्न