शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Mahrashtra Election 2019 : चंद्रकांत पाटील यांना धक्का देण्यासाठी 'यूपी पॅटर्न'?; अजित पवारांचे 'मनसे' संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 13:44 IST

कोथरुडच्या जागेसंदर्भात वेगळाच पॅटर्न राबवण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत.

पुणेः राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोथरुडच्या जागेसंदर्भात वेगळाच पॅटर्न राबवण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. ते म्हणाले, कोथरूडच्या जागेच्या संदर्भात आम्ही सर्व विरोधी पक्षांनी मिळून एक उमेदवार द्यायचा ठरवला होता. त्यानुसार आम्ही राष्ट्रवादीतर्फे स्वप्नील दुधाने यांच्या नावाचा विचार केला होता. राजू शेट्टी यांनी विश्वंभर चौधरी यांचे नाव सुचवले होते.राज ठाकरे यांच्याशी चर्चा करता त्यांनी किशोर शिंदे यांचे नाव सांगितले होते. तिथे लोकसभा निवडणुकीच्या वेळी गिरीश बापट यांना एक लाख मताधिक्य मिळाले होते, म्हणून तिथे एकच उमेदवार देण्याचा विरोधी पक्षांचा विचार होता. मात्र किशोर शिंदे यांना पाठिंबा देणार का, असं पत्रकारांनी विचारताच छाननी झाल्यावर भूमिका स्पष्ट करू, असं अजितदादांनी सांगितलं आहे. राज्याच्या निवडणुकीत चंदक्रांतदादा पाटील उभे असलेल्या कोथरुड मतदारसंघावर सगळ्यांचंच लक्ष आहे. विरोधकांनीही चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखली असून, सर्वपक्षीय मिळून मनसेच्या किशोर शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनी निवडणूक लढविण्याची विश्वंभर चौधरी यांना ऑफर दिली होती. कोथरुडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रिंगणात आहेत. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोथरुडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्याने तसेच आपने देखील डॉ. अभिजीत मोरे यांना उभे केल्याने मतांचे विभाजन टाळण्यासाठी चौधरी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याची आता चर्चा आहे.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019