शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आळेफाटा भागात रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 20:07 IST

नेहमीच्या आकडे टाकुन वीजचोरी पद्धती बरोबरच अलिकडच्या काळात वीजचोर विविध क्लृप्त्या वापरुन चोरी करत असल्याचे काही दिवसांपूर्वी निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वीज चोरांचा छडा लावण्यास महावितरणच्या वतीने प्रारंभ वीजचोरी करणे हा गंभीर स्वरुपाचा दंडनीय गुन्हा

ओतुर- येथे नवीन युक्त्या वापरुन वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी तितक्याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वीज चोरांचा छडा लावण्यास महावितरणच्या वतीने प्रारंभ झाला असुन आळेफाटा उपविभागीय कार्यालय अंतर्गत २० ग्राहकांवर कारवाईचा बडगा महावितरणने उचलला असुन यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.नेहमीच्या आकडे टाकुन वीजचोरी पद्धती बरोबरच अलिकडच्या काळात वीजचोर विविध क्लृप्त्या वापरुन चोरी करत असल्याचे काही दिवसांपूर्वी निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर महावितरणच्या आळेफाटा उपविभाग अंतर्गत गेल्या आठवड्यापासुन कारवाईस प्रारंभ झाला आहे. यासाठी कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. या मध्ये उपकार्यकारी अभियंता श्रीकांत लोथे, सहा.अभियंता विशाल नाईकनवरे, श्रीशैल्य लोहारे आदींचा समावेश आहे. या पथकाने पहिल्या टप्प्यात ओतुर शहर शाखा अंतर्गत मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी करणाऱ्या २० ग्राहकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढे देखील ही कारवाई नियमित सुुुुरु राहणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता श्रीकांत लोथे यांनी सांगीतले. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तर अशा प्रकारे वीज चोरी करणाऱ्या व्यक्तींची माहिती सुजाण नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयास कळवावी असे आवाहन गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल नाईकनवरे यांनी केले आहे. ओतूर व आळेफाटा विभागात वीजचोरी करण्यासाठी रिमोट व विविध युक्त्या वापरून वीजचोरी करणारे यांच्या विरोधात महावितरणने कारवाई सुरू केली आहे ...........................वीजचोरी करणे हे अपघातास निमंत्रण देण्यासारखे आहे तसेच हा गंभीर स्वरुपाचा दंडनीय गुन्हा आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी न करता प्रामाणिकपणे व गरजेपुरता वीज वापर करावा. तसेच वीज चोरी करणाऱ्यां विरोधात कारवाई यापुढे नियमित सुरु राहील. श्रीकांत लोथे, उपकार्यकारी अभियंता,आळेफाटा उपविभाग 

टॅग्स :narayangaonनारायणगावCrime Newsगुन्हेगारीmahavitaranमहावितरण