मुख्य अभियंत्याविनाच महावितरण
By Admin | Updated: August 13, 2015 04:38 IST2015-08-13T04:38:18+5:302015-08-13T04:38:18+5:30
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) पुणे विभागाचे मुख्य अभियंता पद दीड महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून राबविल्या जाणा-या योजनांवर परिणाम होत आहे

मुख्य अभियंत्याविनाच महावितरण
पुणे : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) पुणे विभागाचे मुख्य अभियंता पद दीड महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून राबविल्या जाणा-या योजनांवर परिणाम होत आहे. त्यामुळे रिक्त पदी तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचातर्फे बुधवारी करण्यात आली.
महावितरण कंपनीचे राज्यातील सर्वाधिक ग्राहक पुणे विभागात आहेत. त्यामुळे या विभागातून विक्रमी महसूल मिळतो. त्यामुळे या भागात इन्फ्रा २ या योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे पुणे विभागाच्या मुख्य अभियंत्यांवर महत्वाची जबाबदारी असते. मात्र, मुख्य अभियंता एन. डी. वाडेकर हे ३० जूनला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर गेल्या सहा आठवड्यांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे महावितरण विभागाच्या कारभारावर परिणाम होणार आहे. (प्रतिनिधी)
- इन्फ्रा योजनेला अडथळा निर्माण होऊ नये. तसेच, ग्राहकांना वीज सेवा सुरळीत मिळण्यासाठी तातडीने रिक्त पदी मुख्य अभियंता यांची नियुक्ती करावी, अशी मागणी सजग
नागरिक मंचाचे विवेक वेलणकर व
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे भीमसेन खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.