महाविकासआघाडीमुळे प्रबोधनांच्या परंपरांना बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:39 AM2020-11-22T09:39:56+5:302020-11-22T09:39:56+5:30

संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे आयोजित संविधानरत्न पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी ...

Mahavikasaghadi strengthens the tradition of Prabodhan | महाविकासआघाडीमुळे प्रबोधनांच्या परंपरांना बळ

महाविकासआघाडीमुळे प्रबोधनांच्या परंपरांना बळ

Next

संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे आयोजित संविधानरत्न पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते निलम गोऱ्हे आणि बाबा कांबळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र माळवदकर, ऍड. प्रमोद आडकर, नगरसेविका लता राजगुरू, दादासाहेब सोनवणे, डॉ. गौतम बेंगाळे, डॉ. अमोल देवळेकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर, नगरसेवक अविनाश बागवे, राहुल डंबाळे आदी उपस्थित होते.

गोऱ्हे म्हणाल्या,

सध्याच्या स्थितीत काही आव्हाने व काही शक्तीस्थाने संविधानाची मूल्ये, तत्व विचार व कृती समोर दिसतात. जातीच्या चौकटी बाहेरच्या विवाहांना विरोध, ऑनर किलिंगच्या घटना, महिलांची फसवणूक, ही आव्हाने आहेत. आपली न्यायसंस्था, पोलीस, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्योग क्षेत्र ही सामाजिक शक्ती स्थाने आहेत. या सर्वांचा विचार करूनच महाराष्ट्रात हा राजकीय निर्णय झाला.

सबनीस म्हणाले,

राजभवन हे आता राजकीय पक्षाचा अड्डा झाले आहे. ज्या राजभवनाची दारे कंगना सारख्या अभिनेत्रीसाठी उघडली जातात, त्या राजभवनाची दारे आदिवासी स्त्रीसाठी का उघडली जात नाहीत. देशातील राजकीय व्यवस्था संविधानाच्या दृष्टीने बेईमान असेल तर देशाचे भविष्य उज्वल होणार नाही. आपले संविधान साक्षरता प्रबळ व्हायला पाहिजे. धर्मनिरपेक्ष लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जनतेची विचारवादी शक्ती उत्तम असणे आवश्यक आहे.

Web Title: Mahavikasaghadi strengthens the tradition of Prabodhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.