शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पर्वती, शिवाजीनगर, कसब्यात 'मविआ' ची डोकेदुखी अन् बंडखोरी कायम; महायुतीला फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 16:31 IST

काँग्रेस पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई होईलच पण त्यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचा ठराव केला जाणार

पुणे : पुण्याच्या पर्वती, शिवाजीनगर आणि कसबा विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. आगामी विधानसभेत पुण्यात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असून या बंडखोरीचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांची मनधरणी केली जात होती. मात्र काहींनी माघार न घेता निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. पुण्यातही आता मागील निवडणुकीप्रमाणे महायुतीचे ८ आमदार निवडून येणार का? याबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. 

पर्वती विधानसभा      

पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम, महायुतीकडून भाजपच्या माधुरी मिसाळ आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीमध्ये पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलेला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी आबा बागुल प्रयत्नशील होते. पण, पर्वतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज शेवटच्या क्षणापर्यंत बागुल निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेर त्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. आता पर्वतीत तिरंगी लढत होणार असून त्याचा फायदा मात्र महायुतीला होण्याची शक्यता वाढली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे सचिन तावरे यांनीसुद्धा बंडखोरी केली होती. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, परंतु वेळेमध्ये ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. ३ मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे त्यांचा अर्ज माघार होऊ शकला नाही, पण सचिन तावरे यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंकुश काकडे यांनी सांगितले आहे.

कसबा विधानसभा 

कसबा विधानसभेच्या मैदानात मनसे उतरल्याने तिरंगी लढत होणार आहे. मात्र शहराच्या प्रथम महिला महापौर असलेल्या कमल व्यवहारे यांनी बंडखोरी जाहीर  केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम राहिली आहे. परंतु कमल व्यवहारे अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांची बंडखोरी काँग्रेसने फारशी गंभीरपणे घेतलेली दिसत नाहीये. उलट मनसे मैदानात आल्याने महायुती आणि महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. पण व्यवहारे यांची बंडखोरी काँग्रेसला धक्का देणार का? असे सवालही उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता दिसते आहे. 

शिवाजीनगर विधानसभा 

शिवाजीनगर विधानसभेतून काँग्रेसचे मनीष आनंद यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. या बंडखोरीकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. मनीष आनंद यांची कोणत्याही वरिष्ठ नेत्याने मनधरणी केली नाही. त्याचा किती परिणाम होईल याची काँग्रेस कार्यकर्त्यांनाच शंका असल्याने काँग्रेसही निवांत असल्याचे शिवाजीनगरमध्ये दिसून आले आहे. आगामी विधानसभेत शिवाजीनगरमध्ये महायुतीचे सिद्धार्थ शिरोळे आणि महाविकास आघाडीचे दत्ता बहिरट यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बंडखोरांना पक्षात घेणार नाही 

पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई होईलच. पण महापालिकेच्या आगामी निवडणूकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष बंडखोर किंवा त्यांच्याबरोबर राहिलेले पदाधिकारी यांना उमेदवारी देणार नाही. पक्षात घेणार नाही. असा ठराव करणार. - अरविंद शिंदे, शहराध्यक्ष काँग्रेस.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kasba-peth-acकसबा पेठparvati-acपर्वतीshivajinagar-acशिवाजीनगरvidhan sabhaविधानसभाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी