शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
4
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
5
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
6
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
7
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
8
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
9
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
10
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
11
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
12
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
13
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
14
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
15
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
16
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
17
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
18
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
19
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
20
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

Prakash Javadekar: महाविकास आघाडीची गॅरंटी म्हणजे फसवणूक करण्याचा जाहीरनामा; प्रकाश जावडेकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 17:53 IST

मोदी सरकारच्या काळात, उद्योगधंद्यांचं लोकशाहीकरण झालं असून, सर्वांना उद्योग करायला आता खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळत आहे

पुणे : महाविकास आघाडीतील काँग्रेसची तीन राज्यात सरकार आहे. त्या ठिकाणी काँग्रेसने जेवढी वचने दिली,आश्वासने दिली आणि गॅरंटी दिली. त्यापैकी अनेक गॅरंटी पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या गॅरंटी म्हणजे निश्चित फसवणूक करण्याचा जाहीरनामा आहे अशी टीका भाजपचे नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

प्रकाश जावडेकर म्हणाले, हिमाचल प्रदेशात काँग्रेसने दरवर्षी एक लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिल होत. प्रत्यक्षात दीड लाख सरकारी पद त्यांनी रद्द केली. पुढील दोन वर्ष भरती न करण्याचा निर्णय घेतला. दुसरे आश्वासन जुनी पेन्शन देण्याचे होते. परंतु प्रत्यक्षात सध्याचा पगारच वेळेवर मिळत नाही अशी व्यथा आहे. कर्नाटक मध्ये काँग्रेसने दोन लाख युवकांना दरमहा तीन हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचं गॅरंटी दिली होती. प्रत्यक्षात तोंडाला पाने पुसली आहेत. महिलांना मासिक दोन हजार रुपये देण्याचे मान्य करून प्रत्यक्षात गेल्या दोन महिन्यात हे पेन्शन देण्यात आले नाही. तेलंगणामध्ये बेरोजगार आणि महिला पेन्शन दिलेच नाही. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या गॅरंटी म्हणजे निश्चित फसवणूक करण्याचा जाहीरनामा आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यंतरी एक लेख लिहून देशातील उद्योग जगतामध्ये मक्तेदारी होऊन, ठराविक उद्योगांनाच वाव मिळतो, अशी मांडणी केली आहे. परंतु ही सर्वथा धूळफेक आहे. अशी व्यवस्था काँग्रेस सत्तेत असताना होती. तेव्हा लायसन्स, परमिट राज होते. आता व्यवस्था नीट झाल्यामुळे नवे उद्योग फार मोठ्या संख्येने स्थापन होत आहेत. मक्तेदारी आणि काही लोकांनाच उद्योगाला लायसन्स परमिट देण्याचं काम काँग्रेस करत होतं. मोदी सरकारच्या काळात, उद्योगधंद्यांचं लोकशाहीकरण झालं असून, सर्वांना उद्योग करायला आता खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळत आहे, असेही जावडेकर यांनी सांगितले.

पंतप्रधाना विरुद्धचा खटला चालवण्याचा अधिकारच काढून घातला

महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलण्यात येईल,आरक्षण संपवण्यात येईल असा खोटा प्रचार केला होता. पण आता जनतेला खोटेपणा लक्षात आला आहे. या देशामध्ये घटना संपवण्याचे काम काँग्रेसनेच केलं. 1975 मध्ये आणीबाणी घोषित करून,बोलण्याचं स्वातंत्र्य, संघटनेचे स्वातंत्र्य, विरोधाचे स्वातंत्र्य संपुष्टात आणली होती. आणि हे केवळ पंतप्रधान पदाची खुर्ची वाचवण्यासाठी केलं होतं. पुढे घटनेचा आढावा घेण्यासाठी स्वर्णसिंग कमिटी नेमण्यात आली. या कमिटीने एक महिन्यामध्ये विचार विनिमय पूर्ण करून, अशी दुरुस्ती सुचवली की ज्यामुळे कोर्टाचे अधिकार सुद्धा संपुष्टात आले आणि पंतप्रधानाविरुद्धचा खटला चालवण्याचा अधिकारच त्यांचा काढून घेण्यात आला. त्यामुळे हे काम करणारे जेव्हा घटनेच्या नावाने गळा काढतात आणि हातामध्ये कोऱ्या पानांची घटना ठेवतात ,हेच त्यांचं खरं स्वरूप आहे अशी टिका प्रकाश जावडेकर यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prakash Javadekarप्रकाश जावडेकरPoliticsराजकारणMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी