शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार : संजय राऊतांनी दिले संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 16:04 IST

पदवीधर निवडणुकांच्या वेळी तीनही पक्ष एकत्रित लढल्याने भाजपला फटका बसू शकतो सिद्ध झाले आहे...

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वतंत्र लढणार यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. तेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपला सत्ता मिळू नये म्हणून कितीही पक्ष एकत्र येतील असा दावा केला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता महाविकासआघाडी महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा एकत्र येण्याची संकेत दिले आहे. 

आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार आहे, असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले. पुण्यामध्ये शनिवारी( दि.२०) राऊत यांनी शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते.

राऊत म्हणाले, "महापालिका निवडणुकीत जास्त व ती मान्य करून त्यांनी पक्ष जागा वाटप करून एकत्रित निवडणुका कशा लढवल्या जातील याचा विचार करू". तिथे त्यांची ताकद जास्त तिथे त्यांचे नेतृत्व हे धोरण ठेवत उदाहरण द्यायचं तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल हे पाहू असे राऊत म्हणाले.

पदवीधर निवडणुकांच्या वेळी तीनही पक्ष एकत्रित लढल्याने भाजपला फटका बसू शकतो सिद्ध झाले आहे. त्यामुळे वर्षभरावर आलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये हे पक्ष एकत्रित लढणार का याबाबत चर्चा सुरू होती. आता राऊत यांनी एकत्र राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.‌

विरोधकांनी धार्मिक राजकारण करत मंदिरे उघडायला लावली. आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत हे आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांची वेगवेगळ्या मुद्द्यांवर संवाद साधला. त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपला संवाद आहेच. त्यांची मुलाखत होणार आहे पण पेपर न होता रिझल्ट बघायला मिळेल असं राऊत म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण