शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने फोडाफोडीचे राजकारण केले; काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद यांची टीका

By नितीन चौधरी | Updated: November 19, 2024 14:36 IST

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद यांची टीका

पुणे : भाजपचे नेते घुसखोरी, एक है तो सेफ है, कटेंगे तो बटेंगे... अशी दुहीची भाषा करत आहेत. विकास काय केला ते सांगत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वादळ येत असून पुणे जिल्ह्यात चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद यांनी व्यक्त केला. भाजप सरकारने फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यामुळेच हा रोष मतदानातून दिसून येईल, असेही त्या म्हणाल्या.शमा गेले १५ दिवस पुण्यात तळ ठोकून आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “भाजपने २०१४ मध्ये न्यू इंडियाचे स्वप्न दाखविले. त्यानंतर विकसित भारत, अमृतकाळ अशा खोट्या वल्गना केल्या. हा अमृतकाळ कोठे आहे? कर्नाटक व केरळमध्ये भाजप हरत असताना दुहीच्या राजकारणाची भाषा करण्यात आली. हीच स्थिती आता महाराष्ट्रात आहे. पुण्यात राज्य सरकार विरोधात प्रचंड रोष आहे. वाहतूक समस्या, आयटीतील गुंतवूणक, रोजगार बाहेर जात आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये निराशा आहे. महिला सुरक्षित नाहीत. शेतकऱ्यांचेही प्रश्न आहेत. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे मागे पडत आहे.”भाजप सरकारने फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यामुळेच हा रोष मतदानातून दिसून येईल. त्यामुळेच आघाडीला जिल्ह्यात चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार नाही, असा दावा करत शमा यांनी ही योजना निवडणुकीच्या काळातील मतदारांना दिलेली लाच असल्याची टीका केली. मतदारांना जीएसटी, पेट्रोल-डिझेल यातून पैसा काढून ही योजना राबविली जात असल्याचे कळले आहे. त्यामुळे ही योजना चालणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

आघाडीनेही महिलांना ३ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. ते कसे पूर्ण केले जाईल याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, “काँग्रेसशासित राज्यांमध्ये ही योजना सुरू आहे. त्याचे नीटपणे नियोजन केले आहे. काँग्रेसने पूर्वी अन्नसुरक्षा कायदा, मनेरगा अशा योजना यशस्वीपणे राबविल्या. त्यामुळे ३ हजार रुपयांची योजनाही राबविली जाईल.” भाजप सरकारच्या काळात २० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दाखला देत हे सरकार सोयाबीनला हमी भाव देणार होते. कोठे गेला हा हमीभाव? हे सरकार खोटारडे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.भाजपने केवळ दोन उद्योगपतींसाठीच काम केले आहे. त्यांच्याजवळ देशातील एकूण संपत्तीपैकी ६० टक्के संपत्ती आहे. त्यामुळे कॉर्पोरेट कर ३० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आघाडीने दिलेल्या पाच आश्वासनांमधून जातीनिहाय जनगणना, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त करणे यातून मतदार आघाडीकडे वळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती