शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Mahashivratri 2025 : येळकोट येळकोट जय मल्हार..! महाशिवरात्री निमित्त जेजूरीगडावर मोठा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:19 IST

पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगा लावून मोठ्या उत्साही वातावरणात आणि भंडार खोबऱ्याच्या उधळनीत सदानंदाचा जयघोष

जेजुरी -  महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा (मल्हार) गडावरील त्रेलोकीचे शिवलिंग महाशिवरात्रीनिमित्त  बुधवारी पहाटेच्या सुमारास भाविकांना देवदर्शनासाठी खुले करण्यात आले.  पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगा लावून मोठ्या उत्साही वातावरणात आणि भंडार खोबऱ्याच्या उधळनीत सदानंदाचा जयघोष करीत तीनही लोकांचे दर्शन घेतले. भंडारा खोबऱ्याची उधळन, सदानंदाचा येळकोट, हर -हर महादेव च्या गजराने मल्हारगड दुमदुमून गेला होता.जेजुरीच्या खडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवांमध्ये महाशिवरात्रीउत्सवाला विशेष महत्व आहे महाशिवरात्रीचा प्रारंभ होताच मध्यरात्री १२ च्या सुमारास मुख्य मंदिराच्या कळसातील म्हणजेच स्वर्गलोकीचे शिवलिंग, तसेच मुख्य मंदिरामध्ये असलेले भूगर्भातील पाताळलोकीचे शिवलिंग आणि मंदिरामध्ये असलेले भूलोकीचे शिवलिंग खुले केले जाते. यातील मुख्यकळसातील शिवलिंग व भूगर्भातील शिवलिंग फक्त महाशिवरात्री दिवशीच खुली केली जातात वर्षभर ती बंद असतात.सालाबाद प्रमाणे भाविक भक्तांसाठी श्री खंडोबा मंदिरात पहाटे महाशिवरात्री पूजेचे मानकरी (सोनवणे, वासकर, महाजन आदी) पुजारी सेवेकरी, विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांचे उपस्थितीमध्ये महापूजा करण्यात आली व त्रिलोक दर्शन पहाटे तीन वाजल्यापासून सुरू करण्यात आले असून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. यावेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते, ॲड. विश्वास पानसे, ॲड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे आदी विश्वस्त उपस्थित होते.भाविक भक्तांसाठी सकाळी पासूनच खिचडी प्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.सदरील खिचडी प्रसाद हा भाविक भक्तांसाठी दिवसभर चालू राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडJejuriजेजुरीMahashivratriमहाशिवरात्री