शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Video : यलो अलर्ट जारी..! राज्यात पुढील दोन दिवस धोकादायक हवामानाची शक्यता

By किरण शिंदे | Updated: March 18, 2026 14:02 IST

राज्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा? २० मार्चपर्यंत गारपीट-वादळी वाऱ्याचा इशारा

पुणे  - हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांसाठी इशारा देण्यात आला असून, पुढील दोन दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागातील अधिकारी एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि आसपासच्या जिल्ह्यांना या बदलत्या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासोबतच सोसाट्याचा वारा, गारपीट आणि विजेचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील २४ तासांत धाराशिव आणि विदर्भातील काही भागांत गारपीट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या अचानक बदललेल्या हवामानामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही परिस्थिती २० मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र वातावरणात सुधारणा होऊन आकाश निरभ्र राहील आणि तापमानातही स्थिरता येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Yellow Alert Issued: Hazardous Weather Expected in Maharashtra for Two Days

Web Summary : A yellow alert has been issued for parts of Maharashtra. Unstable weather is expected for two days with light to moderate rain, strong winds, hailstorms, and lightning predicted, especially in Vidarbha. Farmers and citizens are advised to be cautious as the situation is expected to improve after March 20th.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडweatherहवामान अंदाजRainपाऊसPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र