शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
5
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
6
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
7
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
8
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
9
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
10
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
11
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
12
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
13
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
14
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
15
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 17:00 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवार यांनी बारामती मधील टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास अडवल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी मोठी लढत सुरू आहे. दोन्ही बाजूंनी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. दरम्यान, बारामतीमधून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास खासदार शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व नात रेवती सुळे यांना अडवण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. जवळपास अर्धा तास त्यांना गेटवरच अडवल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आज प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे बारामती येथील टेक्सटाइल पार्कमध्ये जात होत्या. यावेळी त्यांना गेटवरच थांबवून ठेवण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान

टेक्सटाईल पार्कच्या गेटवर जवळपास अर्धा तास थांबवण्यात आले.  अर्ध्या तासाने सुरक्षारक्षकाने गेट उघडले. प्रतिभा पवार आणि रेवती सुळे अर्धा तास गेटवर थांबल्या होत्या, गेटवर अडवण्याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रतिभा पवार सुरक्षा रक्षकाला प्रश्न विचारत असल्याचे दिसत आहेत.'तुम्ही आम्हाला पाहून गेट बंद का केलं? गेट बंद करण्यासाठी कोणी सांगितलं. तुम्हाला कोणाचा फोन आला? आतमधील दुकाने बंद आहेत का? आमची गाडी आल्यावर गेट बंद केलं का? आम्ही चोरी करण्यासाठी आलेलो नाही, आम्हाला शॉपिंग करायची आहे, असं त्या व्हिडीओमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे. 

बारामती विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विधानसभा निवडणुका पहिल्यांदा होत आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होत आहे. ही लढत म्हणजे अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच आहे, खासदार शरद पवार यांनी बारामतीमध्ये जोरदार प्रचाराला सुरूवात केली. पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही प्रचार सुरू केला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गांवाना भेटी देत प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, आता उद्या प्रचाराची सांगता सभा होणार आहेत, या सभेत शरद पवार बारामतीमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूक 2024