शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 14:10 IST

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी वाढली आहे.

Sharad Pawar ( Marathi News ) :  राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठं यश मिळालं. यामुळे राष्ट्रवादीतून लढण्यासाठी अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे. 

रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."

खासदार शरद पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांची ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे यांनी भेट घेतली.  या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. यावेळी लांडगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. रवी लांडगे म्हणाले, आता विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत.मी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुका ठाकरे गट महाविकास आघाडीतून लढत आहे. महाविकास आघाडीतून मी इच्छुक उमेदवार असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली. मी भोसरीत कसं काम केलं हे कळवलं. मला सहकार्य करण्याची विनंती केली. भोसरी विधानसभेवर शिवसेनेने दावा सांगितला आहे, मी प्रवेश करताना उद्धव ठाकरेंनी भोसरीवर भगवा फडकणार असल्याचे सांगितले आहे, असंही लांडगे म्हणाले. 

"मी साहेबांना सांगितलं, माझा दोनवेळा मतदारसंघ फिरुन झाला आहे. जागा सोडायचा की नाही हा निर्णय साहेबांचा असणार आहे. आखाडा भोसरीचा असला तरी पैलवान कोणी असू द्या वस्ताद आमच्याकडे आहे, असंही लांडगे म्हणाले.  

माढ्याचे बबन शिंदेंनी भेट घेतली

गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांची भेट घेण्यासाठी नेत्यांची गर्दी वाढली आहे. आज सकाळी माढ्याचे अजित पवार गटातील नेते बबन शिंदे यांनी भेट घेतली.या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ही भेट पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी झाली, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही पवारांची भेट घेतली. 

तसेच आष्टी पाटोद्याचे राम खाडे यांनीही भेट घेतली. गेल्या दोन दिवसापासून खासदार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी नेत्यांची गर्दी वाढली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभा