शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ई - फेरफार प्रकल्पात महाराष्ट्र अव्वल; देशात सर्वाधिक डिजिटल साताबाऱ्याचा वापर महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 20:44 IST

गेले चार पाच वर्षे राज्यातील तलाठी, सर्व महसूल अधिकारी यांनी सातबाऱ्याचे अचूक संगणकीकरण व डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उपलब्ध होण्यासाठी आहोरात्र काम केले, त्याचेच हे फलित आहे.

पुणे :  केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अभिलेखांचे आधुनिकीकरण या प्रकल्पाचे विविध संस्थांकडून केंद्रीय स्थरावर मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये ई-फेरफार प्रकल्पात महाराष्ट्र राज्याने देशात अव्वल क्रमांक पडकवला आहे. तसेच देशात सर्वाधिक डिजिटल साताबा-याचा वापर देखील महाराष्ट्रात होत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. 

राज्यातील तब्बल 2 कोटी 53 लाखापेक्षा अधिक सातबारे संगणकीकृत करून राज्यात सन 2015-16 पासून ई-फेरफार प्रकल्प प्रत्यक्ष सुरू झाला. त्यामध्ये गेल्या पाच वर्षात सुमारे १ कोटी १५ लक्ष पेक्षा जास्त फेरफार तलाठी यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदवून मंडळ अधिकारी यांनी ऑनलाईन पद्धतीने निर्गत केले आहेत. यात ९९% पेक्षा जास्त ७/१२ म्हणजेच २ कोटी ५१ लक्ष पेक्षा जास्त ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्यात आले आहेत. ई - फेरफार प्रकल्पाची यशस्विता आता सामान्य माणसाच्या देखील लक्षात आली असून, महसूल विभागाचा चेहरा मोहरा बदलवून ग्रामीण भागातील पाच कोटीपेक्षा जास्त खातेदारांना या प्रकल्पाचा थेट फायदा झाला आहे.

या प्रकल्पामुळे राज्यातील कोणाही ७/१२ आणि खाते उतारा कोणालाही कोठूनही आणि कोणत्याही वेळी उपलब्ध होवू लागला आहे. दस्त नोंदणीकृत झाल्यानंतर फेरफार नोंदविण्यासाठी तलाठी यांचे कडे स्वतंत्र अर्ज करावयाची आवश्यकता नाही. वारस नोंद, कर्ज बोजा दाखल करणे कमी करणे, ई-करार असे अनोंदणीकृत कागद पत्रावरून फेरफार घेण्यासाठचे अर्ज तलाठी यांना ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यासाठी ई-हक्क प्रणालीची सोय झाली. फेरफार नोंदविण्यासाठी आणि निर्गत करण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी स्थरावर सामान्य माणसाला न्याय मिळू लागला आणि कामातील गतिमानता आणि पारदर्शकता वाढली. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडील फेरफार सध्यस्थिती घरबसल्या पाहण्यासाठी आपली चावडी प्रणालीची सोय आणि प्रलंबित फेरफार चा आढावा घेण्यासाठी तहसीलदार, उप विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना घेण्यासाठी ऑनलाईन एमआयएसची सोय झाली.

ऑनलाईन सातबारावर नाव असल्याशिवाय दस्त नोंदणी होत नसल्यामुळे बोगस ७/१२ जोडून होणारी फसवणूक थांबली. एकच जमीन अनेकांना आता विकता येत नाही त्यामुळे यामुळे होणारी फसवणूक थांबली. 

फेरफार वेळेत निर्गत होवू लागल्याने फेरफार निर्गातीसाठी लागणारा सर्वसाधारण वेळ कमी झाला. आत्ता नोंदणीकृत दस्तांचे  फेरफार नोंदवून निर्गत करण्यासाठी ३४ दिवस आणि अनोंदणीकृत फेरफार नोंदवून निर्गत करण्यासाठी सर्वसाधारण  24 दिवसांचा कालावधी लागतो आहे. बँकेचा सातबारावर बोजा असताना खडाखोड करून तसे खाडाखोड केलेले  ७/१२ जोडून कर्ज मिळविल्याने बँकांची होणारी फसवणूक थांबली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेला डिजिटल सातबारा लिंक केल्यामुळे जमीन नावावर नसताना पीक विमा भरल्याने विमा कंपन्या आणि शासनाची होणारी फसवणूक थांबली आणि करोडो रुपयांची झाली बचत. 

बँकांकडून पीक कर्ज मिळण्यासाठी बँक आता थेट शासनाकडून ७/१२ घेत असल्याने शेतकरी यांना पीक कर्ज मिळणे झाले सोपे. आधारभूत किंमतीवर  धान खरेदी, कापूस आणि अन्य शेती उत्पादने खरेदी साठी सातबारा लिंक केल्यामुळे शासनाची झाली करोडो रुपयांची बचत, कृषी विभागाच्या थेट लाभाच्या योजनांसाठी (DBT) डिजिटल सातबारा लिंक झाल्यामुळे प्रक्रिया झाली अचूक, सोपी आणि गतिमान. आता लवकरच सर्व दिवाणी कोर्ट केसेस मध्ये डिजिटल सातबारा लिंक होणार असल्याने संभाव्य खरेदीदाराला माहित होणार या जमिनीवरील सर्व दावे आणि खटले त्यामुळे होणारी संभाव्य फसवणूक थांबणार. ------ गेले चार पाच वर्षे राज्यातील तलाठी, सर्व महसूल अधिकारी यांनी सातबाऱ्याचे अचूक संगणकीकरण व डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उपलब्ध होण्यासाठी आहोरात्र काम केले, त्याचेच हे फलित आहे. यामुळेच सर्व शेतकरी बांधवाना, बँका आणि शासनाच्या सर्व विभागाना डिजिटल सातबारा उपलब्ध होणे सहज शक्य झाले आहे. आता लवकरच महा-भूमी हे मोबाईल ॲप देखील लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. - रामदास जगताप,  राज्य समन्वयक ई - फेरफार प्रकल्प

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी