शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राने यापूर्वी इतके गलिच्छ राजकारण पाहिले नव्हते; सुप्रिया सुळे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 13:13 IST

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासंबंधी सध्या जे चालले आहे, ते अस्वस्थ करणारे

बारामती : महाराष्ट्राने यापूर्वी राजकीय कटुता पाहिली होती. परंतु इतके गलिच्छ राजकारण पाहिले नव्हते. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासंबंधी सध्या जे चालले आहे, ते अस्वस्थ करणारे असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी सुळे पुढे म्हणाल्या ,देशमुख, मलिक व राऊत कुटुंबीय कोणत्या परिस्थितीतून जातेय हे मी पाहते आहे .परंतु गेल्या आठवड्यात एका भाजप नेत्याच्या तोंडी बदला हा शब्द आहे. त्यांनी हो मी बदला घेतला असे विधान केले. त्यांची ही भाषा अत्यंत दुदैवी असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. ज्या संस्कृतीत मी वाढले, ती ही संस्कृती नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आपण जपतो. त्यात विरोधक हा वैचारिक विरोध करत असतो. त्यात बदल्याची भाषा नसते. बदला घेतल्याची भाषा मी पहिल्यांदा ऐकली. हे अतिशय दुदैवी आहे. ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत ते पाहता विरोधकांचे ते पुढील टार्गेट असावेत. महाराष्ट्राने इतके गलिच्छ राजकारण यापूर्वी पाहिले नव्हते, असेही सुळे  म्हणाल्या.

ते जुनेच विषय उगाळून काढत आहेत खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी केली आहे, यावर त्यांनी या मागणीला आमचा पाठींबा असेल असे स्पष्ट केले. काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल सुरु असलेल्या गदोराळासंबंधी त्या म्हणाल्या, विरोधकांकडे बोलण्यासाठी सध्या काहीही उरलेले नाही. त्यामुळे ते जुनेच विषय उगाळून काढत आहेत. या विषयावर यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आहे. 

कारवाई पूर्णतः चुकीची असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले    संजय राऊत यांचा जामिन रद्द व्हावा अशी मागणी इडीने केली असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, जोपर्यंत उच्च न्यायालयाकडून ऑर्डर येत नाही तोपर्यंत त्यावर बोलता येणार नाही. त्यांची मागील ऑर्डर मी पूर्णपणे वाचली. त्यात त्यांच्यावर झालेली कारवाई पूर्णतः चुकीची असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे फारशी चिंता करावी असे मला वाटत नाही, असे त्या म्हणाल्या. 

विषय आता राजकीय नसून सामाजिक झाला

हर हर महादेव चित्रपटासंबंधी त्या म्हणाल्या, एखादा सिनेमा इतिहासावर असेल. तर किती लिबर्टी घ्यावी हे पाहिले पाहिजे.  हा विषय आता राजकीय नसून सामाजिक झाला आहे. छत्रपतींचा कोणी चुकीचा इतिहास दाखवत असेल तर त्याचा जाहीर निषेध झालाच पाहिजे. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAnil Deshmukhअनिल देशमुखSanjay Rautसंजय राऊतnawab malikनवाब मलिक