शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

Maharashtra Gram Panchayat Election Results : दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा डंका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 16:00 IST

राष्ट्रवादीची हक्काची मानला जाणारी गोपाळवाडी ग्रामपंचायत मात्र भाजपा पुरस्कत पॅनलकडे गेली आहे.

दौंड : दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत यवत , पाटस , लिंगाळी , वरवंड , सोनवडी यासह महत्वाच्या गावात भाजपासह प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड देत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीचा हक्काचा मानला जाणारी गोपाळवाडी ग्रामपंचायत मात्र भाजपा पुरस्कत पॅनलकडे गेली आहे. एकंदरीतच गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. मात्र या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या आधिपत्याखाली असलेल्या पॅनलने तालुक्यात बाजी मारताना पाहायला मिळत आहे  या व्यतिरिक्त काही ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे.अद्याप काही गावातील ग्रामपंचायत निकाल हाती यायचे बाकी आहे. 

दौंड,  हवेली आणि आंबेगाव तालुक्यातील काही किरकोळ प्रकार वगळता संपूर्ण जिल्ह्यात शांतते मतदान पार पडले होते . जिल्ह्यात 649 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 80.54 टक्के मतदान झाले. यामुळे तब्बल 11 हजार 7 उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी (दि.15) रोजी मतदान यंत्रात बंद झाले  होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. उमेदवार, कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्र अगदी गर्दीने खच्च भरली आहे.   

कोरोना व लाॅकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या 748 ग्रामपंचायतीच्या निवडणुकी जाहीर झाल्या. यात 95 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने शुक्रवारी 649 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. यात दौंड तालुक्यात दोन गटांत हाणामारी,  हवेली तालुक्यात गाडी फोडली, आंबेगाव तालुक्यात दुबार मतदान असे काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. यात जिल्ह्यात सर्वाधिक 86.69 टक्के मतदान वेल्हा तालुक्यात तर सर्वात कमी हवेली तालुक्यात 73.98 टक्के मतदान झाले होते. 

टॅग्स :daund-acदौंडgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकResult Dayपरिणाम दिवसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा