शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : अजित पवारांनी करून दाखवलं.! शिवसेनेच्या ''विजय'' ला आमदारकीपासून रोखलं ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 13:22 IST

Pune Election 2019 : पुरंदरमध्ये मिळणाऱ्या मताधिक्क्यावरुन शिवतारे आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं होतं..

पुणे :  काय पोपटासारखा मिटू मिटू बोलायला लागलाय, अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती..?तुझा आवाज किती..? तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होतो ते...अख्या महाराष्ट्राला माहितीय मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही.. आम्ही म्हणतो बाबा , जाऊ द्या जाऊ द्या, गप बसा, गप बसा, याच तर नुसतं उर भरून आलंय .. त्याला काय करू काय नाय ..तू आता २०१९ ला  कसा आमदार होतोय तेच बघणार आहे.. हे वाक्य  आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे विजय शिवतारे यांना लक्ष्य केले होते.  पुरंदर चा आजच्या निकालात काँग्रेसचे संजय जगताप यांनी शिवतारेंचा २५ , ००० मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे अजित पवारांनी दिलेली धमकी खरी करून दाखवली आहे. पुरंदरमध्ये मतमोजणीला सुरुवात केल्यावर शिवसेनेचे विजय शिवतारे आणि काँग्रेसचे संजय जगताप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु होते. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी शिवतारे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. त्यावेळी पवार यांनी शिवतारेंना दिलेली धमकी खरी ठरताना दिसत आहे. पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप 1366 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे पिछाडीवर पडले आहेत. पुरंदर लोकसभेच्या बारामती मतदारसंघात येतो. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे रिंगणात होत्या. त्यावेळी पुरंदरमध्ये मिळणाऱ्या मताधिक्क्यावरुन शिवतारे आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं होतं. त्यावेळी 'विधानसभेला कसा निवडून येतो तेच बघतो', अशा शब्दांत अजित पवारांनी शिवतारेंना इशारा दिला होता. मतमोजणीच्या प्राथमिक टप्प्यांमध्ये पवारांचा हा इशारा खरा ठरताना दिसत आहे.  

टॅग्स :Purandarपुरंदरpurandar-acपुरंदरbaramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019