शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : सत्तर हजार कोटी गेले कुठे, चौकशी करायला नको का? उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 13:24 IST

सिंचन घोटाळ्यावरून पवार यांच्यावर टीका

ठळक मुद्देपिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मैदानावर शिवसेनची शुक्रवारी सायंकाळी सभा ‘‘भाजप-शिवसेना युती मनापासून केली आहे. बंडखोरांची गय करणार नाही.

पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे न बोलवताच ईडीच्या कार्यालयात गेले. बोलवल्यानंतर जावेच लागेल. बँक घोटाळा व सिंचनातील सत्तर हजार कोटी कुठे गेले, याची चौकशी व्हायला नको, असा सवाल उपस्थित करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरीतील सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीका केली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मैदानावर शिवसेनची सभा शुक्रवारी सायंकाळी झाली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा सदस्य अमर साबळे, महापौर राहुल जाधव, भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, उपनेत्या डॉ. नीलम गोºहे, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे,  जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात आम्ही ठरवलय युतीचेच सरकार येणार आहे. गोरगरिबांच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी युती केली आहे. लोकसभेला विरोधी पक्ष थोडा तरी शिल्लक होता. आता विधानसभेच्या निवडणुकीत तोही शिल्लक नाही. काही ठिकाणी उमेदवारही दिले नाहीत. त्यांच्याकडून नाराज होऊन नेते बाहेर पडताहेत. उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावरून विरोधीपक्षाची अवस्था लक्षात येईल. युती सरकार आम्हाला लक्ष्य करीत आहेत, ही पवारांची टीका चुकीची आहे. ’’

त्यांनीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही का?शेतकरी कर्जमाफी ऐवजी कर्जमुक्ती देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. सत्तेचा आणि यंत्रणेचा गैरवापर केला जातोय, असा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे. त्यांनीही सत्तेचा दुरूपयोग केला नाही का? असा सवाल ठाकरे यांनी केला......‘‘भाजप-शिवसेना युती मनापासून केली आहे. बंडखोरांची गय करणार नाही. वचननामा स्वप्न पूर्ण, ३७० कलम वचन पूर्ण झाले. उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही एक झालो आहोत. राष्ट्रवादीची काळी कृत्ये उजेडात आली आहेत.’’ असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजगुरुनगर येथे सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ केले.

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारBJPभाजपाElectionनिवडणूक