शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

Maharashtra Election 2019 : तर, पावणेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 7:00 AM

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात येणार आहे..

ठळक मुद्दे२१ विधानसभा मतदारसंघातील ७ हजार ९१५ मतदान केंद्रावर २१ऑक्टोबर २०१९रोजी मतदान विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांनाही निवडणूक कामकाज बंधनकारक 

पुणे : विधानसभा निवडणूक कामकाजात विविध कारणास्तव सहभागी होण्यास नकार देणाऱ्या आणि निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या खासगी व सरकारी कार्यालयातील तब्बल २ हजार ७७३ अधिकारी आणि कर्मचारी १७ ऑक्टोबरपर्यंत रुजू न झाल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाचे अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी दिली.पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील ७ हजार ९१५ मतदान केंद्रावर २१ऑक्टोबर २०१९रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी ३४ हजार ८१२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी अशी जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व मतदान कर्मचाऱ्यांचे निवडणूक कामकाज विषयक दुसरे प्रशिक्षण १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी सर्व मतदान कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, विविध ८६४ कार्यालयातील २ हजार ७७३ अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर असल्याचे समोर आले आहे. गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी  यांच्या कार्यालयामार्फत लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१च्या कलम १३४ व भारतीय दंड संहिता १८६०च्या कलम १८८ नुसार फौजदारी कारवाईबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या नोटीशीनुसार १७ ऑक्टोबर २०१९पूर्वी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. या वेळीही अनुपस्थित राहिल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत. -----------------काही खासगी शाळांतील कर्मचाऱ्यांना आम्हाला निवडणूक कामकाज बंधनकारक नसल्याचे वाटते, काहींना काम नको आहे अशा विविध कारणास्तव कामकाजात सहभागी न होणाऱ्या सरकारी आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. नोटीशीनंतरही ते अनुपस्थित राहिल्यास संबंधितांवर निवडणूक नियमानुसार दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच, १८६०च्या कायद्यातील १८८कलमानुसार गुन्हाही दाखल करण्याचे अधिकार आहेत. या शिवाय संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश संबंधित कार्यालयाला देण्यात येतील. महेश आव्हाड, अपर जिल्हाधिकारी, मनुष्यबळ कक्ष विभाग--------------विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांनाही निवडणूक कामकाज बंधनकारक निवडणूक कामकाजाबाबत काही विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांचे अधिकारी आणि कर्मचाºयांनी निवडणूक कामकाजाच्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली. या याचिकेवर १ ऑक्टोबर २०१९ रोजी दिलेल्या आदेशानुसार विना अनुदानीत संस्थांनी देखील निवडणुकीचे कामकाज करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व विना अनुदानीत संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग