शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीत चुरसच राहिली नाही..: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 19:34 IST

राज्यात महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ..

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रचारास येत नाहीत तर राष्ट्रवादीमध्ये कोणी राहण्यास तयार नाही

सासवड  : ‘‘विधानसभा निवडणुकीत काही चुरस राहिलेली नाही. राज्यात महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सासवड येथे केले. युतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी सासवड येथील पालखी मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर सभा झाली. यावेळी ते बोलत  होते.  फडणवीस म्हणाले, काँग्रेस -राष्ट्रवादीच्या १५ वर्षाच्या काळात जे काम झाले नाही, त्यापेक्षा युतीच्या पाच वर्षाच्या काळात जास्त विकास कामे झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रचारास येत नाहीत तर राष्ट्रवादी मध्ये कोणी राहण्यास तयार नाही. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच आहे. निकालानंतर काँग्रेसचे संख्याबळ निम्मे होईल.  मागील पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे पुरंदर तालुक्यात ज्यांनी आणली त्या विजय शिवतारेंना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीने कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देऊ. गुंजवणी प्रकल्पाच्या उभारणीपासून ते जलवाहिनीच्या अंतिम कामपर्यंत अनेक संकटांवर मात करत विजय शिवतारे यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणारच व त्याद्वारे शेती, रोजगार, रस्ते आदीमार्गे विकास मार्गी लागणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.  विजय शिवतारे म्हणाले,    सत्तेच्या ५ वर्षात पुरंदर - हवेलीतील अनेक कोटींची शेततळी, बंधारे, रस्ते, पाणी योजना, कचरा डेपो कपींग व बायोमायनिंग आदी विकासकामे मार्गी लागली. तालुक्यात  यापुढे   कोणत्याही स्वरूपाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.  यावेळी  माजी आमदार संभाजी कुंजीर, जालिंदर कामठे, पंडित मोडक, दिलीप यादव, सचिन लंबाते, गिरीश जगताप, शंकर हरपळे, अजित जाधव, साकेत जगताप आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी आमदार प्रसाद लाड, बाबा जाधवराव, संगीता राजेनिंबाळकर, राहुल शेवाळे, रमेश जाधव, दत्ता काळे, विष्णू भोसले, पंढरीनाथ जाधव, मंदार गिरमे, अभिजित जगताप, सचिन भोंगळे, डॉ अस्मिता रणपिसे, डॉ राजेश दळवी यांसह पुरंदर - हवेलीतील शिवसेना, भाजपा, रिपाई महायुतीचे कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते. अतुल म्हस्के यांनी सूत्रसंचलन केले. 

टॅग्स :JejuriजेजुरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस