शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Maharashtra Election 2019 : खेड तालुक्यातील जनता थापांना भुलणार नाही : सुरेश गोरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 1:20 PM

शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय आता नागरिकांसाठी पश्चात्ताप बनला आहे.

खेड :  तालुक्यातील जनतेने दहा वर्षांत खूप काही सहन केले़. तालुक्यातील जनतेला अक्षरश: लुटले; तेच आता मतांसाठी गयावया करत फिरत आहेत.या गुंडांच्या राजकारणाला जनता आता कंटाळली आहे़. त्यामुळे कोणीतीही स्वप्ने दाखवली तरी इथली जनता भूलथापांना बळी पडणार नाही़. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार सुरेशे गोरे यांनी व्यक्त केला़. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचाराचा नारळ निमगाव (ता. खेड) येथे श्रीक्षेत्र खंडोबा मंदिरात माजी खासदार शिवराजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आला़ या वेळी  बाबाजी काळे, संतोष डोळस,  शिवाजी वर्पे, विजया शिंदे, सुभद्रा शिंदे, भगवान पोखरकर, ज्योती आरगडे, सुनीता सांडभोर, रूपाली कड, अंकुश राक्षे, अमर कांबळे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, विजयसिंह शिंदे पाटील, किरण मांजरे, सूर्यकांत मुंगसे, अशोक खांडेभराड, सुरेश चव्हाण, प्रकाश वाडेकर, नंदा कड, माऊली कटके आदीउपस्थित होते़ शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले, शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय आता नागरिकांसाठी पश्चात्ताप बनला आहे. राष्ट्रवादी पक्षाची आता वाताहत झाली आहे. पुणे व पिंपरी परिसरात घड्याळ घेता का घड्याळ इतकी वाईट परिस्थिती आहे. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे जनतेने आता सेना-भाजपला साथ दिली पाहिजे.  यावेळी माऊली कटके,अशोक खांडेभराड आदींची भाषणे झाली........मित्रपक्षाचा तांडा अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी असले तर आम्हालाही वेगळा निर्णय घ्यावा लागेल. ज्याने दहा वर्षांत जनतेला त्रास दिला त्याला निवडून आणायचे आहे का? असा सवाल करीत आमचे नाणे खणखणीत आहे. खेड तालुक्याचा विकास आमदार सुरेश गोरे यांनी केला असून, तेच पुन्हा बहुमताने निवडून येतील, असा विश्वासही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला़. ..........

टॅग्स :KhedखेडPoliticsराजकारणShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावElectionनिवडणूक