शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : ' पर्वती' मध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 20:10 IST

गेल्या 30 वर्षांपासून आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत नाराज काँग्रेस नगरसेवकाकडून बंडाचे निशाण..

ठळक मुद्देजाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप

पुणे : काँग्रेस पक्षाकडे परंपरागत असलेला पर्वती मतदार संघ या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीकडे देण्यात आल्याने काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरलेली असतानाच आता ज्येष्ठ  नगरसेवक आबा बागूल यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. बागूल शुक्रवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. पर्वती मतदार संघामध्ये तब्बल वीस वर्ष काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत. काँग्रेसचे वसंत चव्हाण एकदा, शरद रणपिसे दोन वेळा आणि रमेश बागवे एकदा असे चार आमदार पर्वतीने काँग्रेसला दिले. मतदार संघामध्ये काँग्रेसचा परंपरागत मतदारही आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून अभय छाजेड आणि राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप यांनी निवडणूक लढविली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे. आघाडीच्या जागा वाटपामध्ये पर्वती मतदार संघ राष्ट्रवादीला सोडण्यात आला आहे. पर्वतीसाठी काँग्रेसकडून आबा बागूल यांनी मुलाखतही दिली होती. बागूल हे अनेक वर्षांपासून उमेदवारी मागत आहेत. परंतू, मतदार संघ राष्ट्रवादीला गेल्याने बागूल नाराज झाले आहेत. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पर्वती पुन्हा काँग्रेसकडे घेण्याबाबतही प्रयत्न केले. परंतू, त्यामध्ये यश आले नाही. आता बागूल यांनी उघड नाराजी व्यक्त करीत अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याचे सांगितले. सकाळी नऊ वाजता कार्यकर्ते व नागरिकांची बैठक घेऊन दुपारी बारापर्यंत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून आपल्यावर अन्याय होत असून आता मी माझ्या क्षमता आणि अस्तित्व दाखवून देणार असल्याचे बागूल यांनी सांगितले. राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या नगरसेविका अश्विनी कदम आणि बागूल एकाच प्रभागातील नगरसेवक आहेत. बागूल खरेच अपक्ष उमेदवारी दाखल करतात की पुन्हा आपला आक्रमक पवित्रा मागे घेतात याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण