Maharashtra election 2019 : पहिलवान वगैरे गोष्टी सांगू नका.; मी कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 20:11 IST2019-10-15T19:17:41+5:302019-10-15T20:11:05+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात सध्या चांगलाच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. फडणवीस यांनी आमचा पहिलवान तेल  लावून तयार आहे. पण समोर कुस्ती खेळायला कोणी नाही असा टोला विरोधकांना लगावला होता.

 Maharashtra election 2019: Don't say things like wrestling; I am the president of the wrestling team : Sharad Pawar | Maharashtra election 2019 : पहिलवान वगैरे गोष्टी सांगू नका.; मी कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष 

Maharashtra election 2019 : पहिलवान वगैरे गोष्टी सांगू नका.; मी कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष 

पुणे : आम्ही हवे तितके पहिलवान उभे करू, कारण मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.  हडपसर येथे महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात सध्या चांगलाच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. फडणवीस यांनी आमचा पहिलवान तेल  लावून तयार आहे. पण समोर कुस्ती खेळायला कोणी नाही असा टोला विरोधकांना लगावला होता. त्यावर आता पवार यांनी उत्तर दिलेले बघायला मिळत आहे. 

पवार यावेळी बोलताना म्हणाले की, आम्ही हवे तिकडे पहिलवान उभे करु हाकतो, कारण महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष मी आहे. सगळे जिल्हे, सगळ्या कुस्ती संघटनांचा अध्यक्ष मी आहे. मी राजकारणाबाहेर खेळाच्या क्षेत्रातही काम केले. मी मुंबई, महाराष्ट्र आणि जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. मला अनेक खेळाडू तयार करण्यात रस आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला पहिलवान वगैरे गोष्टी सांगू नका. आम्ही हवे तितके लोक तयार केलेत असेही ते म्हणाले. 

यावेळी पवार यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • राज्य भाजपच्या हातात आहे. राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे. तुमच्याकडे प्रपंच दिला आणि तुम्ही आम्हाला विचारताय आम्ही काय केलं ? फडणवीस साहेब  हे वागणं बरं नवं, जरा नीट वागलं पाहिजे. आम्ही काय केलं हे महाराष्ट्राला माहीती आहे. 
  • भाजपचा दावा आहे की लोक आमच्या बाजूने आहेत. मग देशाचे पंतप्रधान ८ सभा का घेतात, गृहमंत्री राज्यात २० सभा का घेत आहे ? आणि असं असूनही आम्हाला विचारतात काय केल ?
  • अमित शहा यांना प्रश्न विचारतो, पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नाव कोणाला माहिती होत ? फक्त गुजरातच्या लोकांना माहिती होत.आणि तेच आम्हाला येऊन विचारतात तुम्ही काय केलं. 
  • शिवछत्रपतींचे स्मारक करतो हे जाहीर केले. त्यांची मोदी यांना बोलावलं, जलपूजन केलं आणि पाच वर्षांत वीटही उभारली नाही. 
  •  छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि राज्यातील किल्ले लग्न कार्यासाठी द्यायचे हे धोरण चुकीचे आहे. किल्ले हा महाराष्ट्राचा, मराठ्यांचा इतिहास आहे. बार, छमछममध्ये रस असेल तर चौफुल्याला जा आणि काय करायचे ते करा. 

Web Title:  Maharashtra election 2019: Don't say things like wrestling; I am the president of the wrestling team : Sharad Pawar