शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Maharashtra Election 2019 : उद्योगपतींना कर्जमाफी; शेतकरी मात्र देशोधडीला : शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 13:29 IST

शेतकऱ्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे.

ठळक मुद्देतळेगावमध्ये युती सरकारवर टीकाराज्यात उद्योगधंदे बंद पडत चाललेत, बेरोजगारी वाढत आहे

तळेगाव दाभाडे : राज्यात उद्योगधंदे बंद पडत चाललेत, बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. स्त्रियांना कसलीच सुरक्षितता नाही. केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगार विरोधी असून उद्योगपतींना कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी देताना शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. राज्याच्या विकासाचे दावे करणारे राज्य सरकार सत्तेचा नेमका कुणासाठी वापर करत आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी उपस्थित केला. तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत ते शुक्रवारी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी खासदार नाना नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, एसआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, अत्याचारात वाढ झाली आहे. शासनाची जेट विमान कंपनी बंद पडली. वीस हजार कामगार बेरोजगार झाले. आघाडी सरकारच्या काळात सुस्थितीत असलेल्या विविध सरकारी कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे बंद पडल्या आहेत, असे पवार म्हणाले.सूत्रसंचालन दत्तात्रय पडवळ आणि सुभाष जाधव यांनी केले. तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी आभार मानले.

एकीकडे मोठी थकबाकी असल्याने अडचणीत आलेल्या बँकेला सरकारी तिजोरीतून ८१ हजार कोटी रुपयांची मदत सरकार देते, तर दुसरीकडे नैसर्गिक संकटांनी अडचणीत आलेल्या शेतकºयांकडून शेतीकर्जाच्या वसुलीसाठी भांडीकुंडी जप्तीचा बडगा सरकार उगारत आहे. कर्जबाजारी शेतकºयांसाठी राज्य सरकार सत्तेचा वापर करत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी