शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Maharashtra election 2019 : भोरमध्ये काँग्रेस-शिवसेना पुन्हा आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 3:28 PM

२००९, २०१४ साली आमदार संग्राम थोपटे यांनी एकतर्फी नव्हे, पण चुरशीच्या लढतीत विरोधक शिवसेनेवर मात केली होती.

ठळक मुद्देशिवसेनेचे कोंडे दुसऱ्यांदा जनमत अजमावणार; कलाटेंच्या बंडखोरीकडे लक्ष 

अन्वर खान - भोर- मुळशी- वेल्हे या दुर्गम भागातील भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे संग्राम थोपटे सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्ट्रिक साधणार की यंदा भाजप-सेना युती हा काँग्रेसचा गड काबीज करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. २००९, २०१४ साली आमदार संग्राम थोपटे यांनी एकतर्फी नव्हे, पण चुरशीच्या लढतीत विरोधक शिवसेनेवर मात केली होती. त्यामुळे यंदा तिसऱ्या विजयाची त्यांना आशा आहे. गतवेळी त्यांना शिवसेनेचेच कुलदीप कोंडे यांनी आव्हान दिले होते. मात्र, त्या वेळी भाजप-सेना युती नव्हती. त्याचा फायदा थोपटेंना मिळाला. तसे पाहता, भाजप-सेना यांना मिळालेली मते ही थोपटेंपेक्षा जास्त होती. त्यामुळेच यंदा हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. त्यांना भाजपची जोरदार साथ मिळाल्यास थोपटेंपुढे निश्चितपणे आव्हान उभे राहू शकते, याची जाण थोपटेंना आहे. त्यामुळेच यंदा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व तालुक्यातील राष्ट्रवादीची मोलाची साथ त्यांना मिळत आहे. थोपटेंसाठी आघाडी धर्म पाळत सुप्रिया सुळे या दुर्गम भागात मतदारांशी संपर्क साधत कोपरा-कापरा पिंजून काढत आहेत. त्यांचा निश्चित फायदा थोपटेंना होणार आहे. लोकसभा निवडणुकीत थोपटेंच्या मतदारसंघाने सुप्रियातार्इंना चांगली साथ दिली होती. त्याची परतफेड यानिमित्ताने राष्ट्रवादीकडून होत आहे.भोरचा मतदारसंघ तसा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. अनंतराव थोपटे यांनी या मतदारसंघात सहा वेळा बाजी मारली आहे. फक्त १९९९मध्ये राष्ट्रवादीचे काशिनाथ खुटवड यांनी थोपटेंना पराभूत केले होते. पण, २००४ साली पुन्हा अनंतराव थोपटेंनी बाजी मारली. नंतर २००९पासून त्यांनी मुलगा संग्राम थोपटे याच्यासाठी मतदारसंघ मोकळा करून दिला. त्यानंतर संग्राम थोपटे सलग दोनदा (२००९, २०१४) विजयी झाले. मात्र, यंदा त्यांच्यासमोर एकजुटीने ‘युती’चे मोठे आव्हान उभे आहे. तब्बल सहा धरणे व सुपीक प्रदेश भातशेतीचे आगर असलेला हा मतदारसंघ आहे. मात्र, उन्हाळ्यात अनेक गावांत पाणीटंचाई दिसते. रोजगार नसल्याने तरुण वर्ग पुण्या-मुंबईकडे वळला आहे. भोरमध्ये इंडस्ट्रीने फारसा जोर धरला नाही. त्यामुळे ‘विकासा’ची संधी आहे. युतीने नेमके हेच कारण पुढे करत थोपटेंना आव्हान दिले आहे. तरीसुद्धा अनंतराव थोपटेंना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. काँग्रेसचा खेडोपाडी पसरलेला प्रभाव या मतदारसंघात अजूनही दिसून येतो. थोपटेंनी सहकाराबरोबर शिक्षण संस्थांचा वापर मतदारसंघाच्या बांधणीसाठी प्रभावीपणे केला आहे. त्याचे फळ त्यांना निवडणुकीत मिळते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.शिवसेनेकडून कुलदीप कोंडे यांना उमेदवारी मिळाली असली, तरी इच्छुकांची संख्याही मोठी होती. त्यांच्या नाराजीचा फटका कोंडेंना बसण्याची शक्यता आहे. मुळशीचे बाळासाहेब चांदेरे, आत्माराम कलाटे, भाजपचे किरण दगडे-पाटील, शरद ढमाले यांनीही उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या कांचन कुल यांनाही या मतदारसंघात लक्षणीय मते मिळाली होती, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही........कलाटे यांची बंडखोरी थोपटे यांना फायदेशीर४भोर मतदार संघात मुळशी तालुक्याने नेहमीच थोपटेंना साथ दिली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आलेले आत्माराम कलाटे यांना विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे त्यामुळे मुळशीतील शिवसेनेची मते कलाटेंना मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा अनायसे संग्राम थोपटे यांनाच होणार आहे. ......२०१४ची निवडणूक संग्राम थोपटे (काँग्रेस) ७८,१६२ मतेकुलदीप कोंडे (शिवसेना) ५९,५४५विक्रम खुटवड (राष्ट्रवादी) ५०,००३शरद ढमाले (भाजप) २४,४०१. .........२०१४ ची निवडणूक संग्राम थोपटे (काँग्रेस) ७८,१६२ मतेकुलदीप कोंडे (शिवसेना) ५९,५४५विक्रम खुटवड (राष्ट्रवादी) ५०,००३शरद ढमाले (भाजप) २४,४०१. 

टॅग्स :bhor-acभोरElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसShiv Senaशिवसेना